कन्नड कलाकार दर्शनला हत्या प्रकरणात अटक

Kannada actor Darshan arrested in Murder Case : कन्नड कलाकार दर्शनला बंगळूरू पोलिसांनी हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

Advertisement
Read Time: 1 min
अनाथरू, कटेरा या सिनेमांसाठी दर्शन ओळखला जातो.
बंगळूरु:

कन्नड कलाकार दर्शनला बंगळूरू पोलिसांनी हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरुद्ध शहरातल्या कामाक्षीपाल्या पोलीस स्टेशनमध्ये 9 जून रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आलीय. म्हैसुरुमधील फार्म हाऊसमधून त्याला अटक करण्यात आलीय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरु पोलिसांना कामाक्षीपाल्यामधील एका नाल्याजवळ रेणुकास्वामी या व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. 8 जून रोजी त्याची हत्या करण्यात आली होती. फार्मसी कंपनीमध्ये काम करणाऱ्या स्वामीनं दर्शनच्या जवळच्या अभिनेत्रीला सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज पाठवले होते. 

भटके कुत्रे नाल्यातून मृतदेह ओढत असल्याचं स्थानिक नागरिकांना आढळल्यानंतर स्थानिकांनी पोलीसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात काही संशयितांना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दर्शनला अटक करण्यात आली आहे. 

( नक्की वाचा : बॉलिवूड अभिनेत्याला सीरिअल किलर समजून घेरलं, पळ काढला नसता तर गेला असता जीव )
 

दर्शनचा या हत्या प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग आहे का? याचा तपास बंगळुरु पोलीस सध्या करत आहेत. या विषयी अधिक माहिती देण्यास पोलिसांनी सध्या नकार दिलाय. अनाथरू (2007), क्रांतिवीर सांगोली रायण्णा (2012) कटेरा (2023) या चित्रपटांतील भूमिकांसाठी दर्शन ओळखला जातो. 

Advertisement