महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेन दिवस वाढ होताना दिसत आहे. अनेक प्रकरणात लग्नाचे आमिष दाखवत महिला आणि तरुणींचे शोषण केल्याच्या घटना घडत आहे. त्यातून पुढे फसवणूक झाल्याचे ही उघड होत आहे. काही प्रकरणांना तर गंभीर वळण निर्माण होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात प्रियकर हा विवाहीत असताना ही त्याने एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं.
प्रफुल्ल जाधव हा विवाहीत आहे. तो कोल्हापुरात राहातो. विवाह झाला असताना ही त्याने एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. शिवाय मी माझ्या बायकोला सोडणार आहे. त्यानंतर आपण लग्न करू असं आश्वासन ही त्याने तिला दिलं होतं. त्याच्या बोलण्यावर ही तरुणी भूलली. त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर आपलं सर्वस्व त्याच्या हवाली केलं. या विश्वायाच गैर फायदा मात्र प्रफुल्लने घेतल्याचा आरोप आता या तरुणीने केला आहे.
पत्नीला सोडणार आहे असं प्रफुल्लने सांगितलं होतं. त्यावर आपण विश्वास ठेवला. त्यानंतर तो वारंवार आपल्याला वेगवेगळ्या रिसॉर्टवर घेवून जात होता. तिथेच तो अत्याचार करत होता असं तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या शरिर संबंधातून तरूणी गर्भवती राहीली होती. तिला तीन महिने ही झाले होते. याबाबत तिला समजल्यानंतर ती घाबरली. याबाबत प्रफुल्ल याला सांगितलं पाहीजे असं तिला वाटलं. त्यानंतर ती ताडीने प्रफुल्लकडे गेली.
वारंवार केलेल्या शरिरसंबंधातून आपण गर्भवती राहीली असल्याचं तिने त्याला सांगितलं. शिवाय तीसरा महिना सुरू असल्याचं ही तिने त्याला सांगितलं. मात्र ही ऐकताच प्रफुल्ल संतापला. त्याने त्या तरुणीला शिवागाळ करण्यास सुरूवात केली. तिला तो धमकी देवू लागला. त्यामुले घाबरलेल्या तरुणीने थेट शाहूपुरी पोलिस ठाणे गाठले. तिने त्याच्या विरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. शाहूपुरी पोलीस ठाणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.