विशाल पाटील, प्रतिनिधी
BJP Leader Suraj Sakhare Firing Case : कोल्हापुरात भाजप कार्यकर्ते सुरज साखरे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्र फिरवून दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. रफिक मुल्ला आणि शहाबाज मुल्ला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.सांगली-कोल्हापूर सीमेवरील अंकली पुलाजवळ पोलिसांनी सापळा रचून या दोघांनाही ताब्यात घेतले.
सुरज साखरे या भाजप कार्यकर्त्याचा गुरुवारी (16 जुलै) सायंकाळी नवीन वाशी नाका काल्हापूर ते फुलेवाडी रिंगरोडकडे जाणारे रोडवर स्टार लोकल मार्ट जवळ गोळीबार करण्यात आलेला.याच प्रकरणातील संशयित दोघांना आज पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.. पोलिसांनी या दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी सुरज साखरे यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली आहे.
प्राथमिक तपासानुसार,हा हल्ला केवळ खाजगी सावकारीच्या वादातून झाला नसून,आरोपींनी मोठी आर्थिक 'सुपारी' घेऊन हा गोळीबार केला असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे.रफीक उर्फ देवा पिरसाहेब मुल्ला (वय 39 रा.शाहु कॉलणी विक्रमनगर कोल्हापूर) शहाबाज राजु मुल्ला (वय 23 रा.मणेरमळा कोल्हापूर) अशी दोघांची नाव आहेत.
नक्की वाचा >> Mahesh Tutorials : मुंबईत फक्त 'या' ठिकाणीच महेश ट्युटोरियलचं कोचिंग सेंटर सुरू,इतर सर्व शाखा बंद, कारण काय?
हॉटेल,लॉजचे सीसीटीव्ही फूटेज तपासले
स्थानिक गुन्हे अन्वेषण चे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके नेमण्यात आली.दोन्ही पथकांना मार्गदर्शन करुन सूचना दिल्या आणि त्यांनी स्वतः तपास सुरु करून हल्ला झालेल्या सुरज साखरे यांच्या विरोधकांची माहिती घेण्याचे काम सुरु केलं. नेमणूक केलेल्या पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक जालीदार जाधव यांच्या पोलीस पथकातील पोलीस अमंलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी असणारे सर्व सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. तसेच सदर परिसरातील हॉटेल,लॉजेसची पाहणी केली.
पोलिसांनी अंकलीपूल जयसिंगपूर येथे छापा टाकला
घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी दोन व्यक्ती आढळून आल्या. या दोघांच्याकडे एक दुचाकी मोपेड दिसून आले.देवा उर्फ रफिक मुल्ला (रा.विक्रमनगर) आणि त्याचा साथीदार शाहबाज मुल्ला (रा.मणेरमळा)अशी दोघांची नावे आहेत.दोघेही आज अंकली पुल जयसिंगपुर येथे येणार अशी खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली.
नक्की वाचा >> Akola News: हातात भरल्या बांगड्या, ओठांवर लिपस्टिक..अकोला-बडनेरा ट्रेनमध्ये मुलीने तरुणाला दिली अनोखी शिक्षा
त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी तात्काळ त्यांना अंकलीपूल जयसिंगपुर येथे छापा टाकून दोघांची चौकशी केली.या चौकशीमध्ये दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.गोळीबारबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रथमता उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांनतर त्यांचेकडे कसून चौकशी केली.त्यांनीच सूरज साखरेला ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला, अशी कबुली दिली.