वसईत भूमाफियांची दहशत, कारवाईसाठी गेलेल्या उपायुक्तावर हल्ला

महापालिकेच्या पथकावर भूमाफियांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात महापालिकेचे उपायुक्त जखमी झाले आहेत. त्यांना या भूमाफियांनी मारहाणही केली.

Advertisement
Read Time: 2 mins
वसई:

अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर भूमाफियांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात महापालिकेचे उपायुक्त जखमी झाले आहेत. त्यांना या भूमाफियांनी मारहाणही केली. वसई विरार महापालिकेच्या पथकावर हा हल्ला झाला. वसई पूर्वेच्या कामण-शीलोत्तर येथे ही घटना घडली. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

भूमाफियांनी कामण-शीलोत्तर येथे अतिक्रम केले होते. हे अतिक्रमण हटवण्यासाठी उपायुक्त अजित मुठे हे आपल्या पथकासह गेले  होते. त्यावेळी त्यांच्याल भूमाफियांनी हल्ला केला.  MSF चे जवानमध्ये आल्याने उपायुक्त मुठे हे थोडक्यात बचावले. यात  महिला MSF जखमी झाली आहे. तिचा यावेळी भूमाफियानी विनयभंगही केला. वसई विरार महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने चिंचोटी पेट्रोल पंपा समोर ही कारवाई केली. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'राजकारणात एक तर मी राहीन, नाहीतर फडणवीस राहतील'

तसेच 39 सर्वे नंबर येथे ही कारवाई केली. त्यानंतर कामणच्या शिलोत्तर येथे कारवाई करीत असताना दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास अरविंद श्रीवास्तव, सदानंद भुरे हे दोघे महानगरपालिकेचे उपायुक्त अजित मोठे व त्यांच्या पथकावर धावून गेले. शिवाय अश्लील शिवीगाळ केली. तिथे असणाऱ्या कर्मचाऱ्यावर हल्ला केला. यामध्ये कृष्णा संपत विघ्ने हा जखमी झाला. यावेळी तेथे असणाऱ्या महिला एमएसएफ यांना धक्काबुक्की करून विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी  नायगांव पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा दाखल करण्यात आला  आहे अशी माहिती उपायुक्त  अजित मुठे यांनी दिली आहे.

Advertisement