Leopard attack: आई समोरच चिमुकल्याला बिबट्याने पळवलं, लेकासाठी आईचा पाठलाग,पुढे काय झालं?

बिबट्याने ज्यावेळी मुलाला उचलून नेले त्यावेळी त्याची आई तिथेच होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

देवा राखुंडे 

दौंड तालुक्यातील दहिटणे येथून एका 11 महिन्याच्या मुलाला बिबट्या उचलून घेऊन गेला. ज्यावेळी बिबिट्या त्या चिमुकल्याला उचलून घेवून गेला, त्यावेळी त्याची आई तिथेच होती. आईच्या समोरच बिबट्याने त्या लहान लेकरावर झडप घातली आणि पळून गेला. दहिटणे येथील बापूजीबुवा वस्ती येथे ही घटना घडली आहे. यावेळी भिसे कुटुंबीय बकऱ्यांच्या वाड्यावर होतं. त्याच वेळी अनवित भिसे या अकरा महिन्याच्या त्यांच्या मुलाला बिबट्याने उचलून नेले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बिबट्याने ज्यावेळी मुलाला उचलून नेले त्यावेळी त्याची आई तिथेच होती. तिने डोळ्या देखत मुलाला बिबट्या नेत आहे हे पाहीले. त्यावेळी तिने आरडाओरडा केला. त्यानेही काही फरक पडला नाही. ती त्या बिबट्या मागे धावत गेली. पण तरीही तिच्या हाती काही लागले नाही. शेतात तो बिबट्या गायब झाला. तिच्या आरडाओरडा केल्याने आजूबाजूला असलेले लोक तिथं जमा झाले. त्यानंतर तिने झालेल्या प्रकार सर्वांना सांगितला. 

ट्रेंडिंग बातमी - Nashik News: सिनेस्टाईल थरार! पोलिसांच्या हातावर तुरी देवून पळाला, 12 तासाच्या आता पुन्हा गजाआड झाला

सगळीकडे भितीचे वातावरण पसरले. गावकऱ्यांनी एकत्र येत मुलाला शोधण्याचा प्रयत्न केला. लाठ्याकाठ्या घेवून सर्व जण शेतात घुसले. काहींनी वन विभागाला याची माहिती दिली. वन विभाग आणि यवत पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने परिसरामध्ये बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली . मात्र सायंकाळी 6 वाजेपर्यंत तरी या चिमुकल्याचा कसलाच थांगपत्ता लागलेला नाही. वनविभाग स्थानिक अश्या दोन्ही पोलिसांच्या पथकांकडून डॉगस्कॉड माध्यमातून त्या चिमुकल्या मुलाचा शोध घेतला जात आहे.