Shocking News : प्रेम, फसवणूक आणि सत्ता: महिला DSPने जाळ्यात ओढून व्यावसायिकाकडून कोट्यावधी हडपले!

Shocking News : एका अत्यंत धक्कादायक प्रकरणामुळे पोलीस दलाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Shocking News : या प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मुंबई:

Shocking News : एका अत्यंत धक्कादायक प्रकरणामुळे पोलीस दलाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एका व्यावसायिकाने एका महिला पोलीस उपअधीक्षक (DSP) अधिकाऱ्यावर खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात लाखो रुपयांचे दागिने, महागडी वाहनं आणि कोट्यवधी रुपयांची रोकड हडपल्याचा दावा करण्यात आला आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

हे गंभीर प्रकरण छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील आहे. पीडित व्यावसायिक दीपक टंडन यांचा दावा आहे की, डीएसपी कल्पना वर्मा यांनी आधी त्यांना प्रेमाच्या जाळ्यात फसवले आणि नंतर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये, महागड्या गाड्या आणि मौल्यवान दागिने घेतले. 

( नक्की वाचा : Pune News : एक बाई आणि 12 भानगडी! ॲसिड हल्ला ते पुरुषांवर जबरदस्ती ! 'या' बाईची संपूर्ण पुण्यात चर्चा )

टंडन यांनी आरोप केला आहे की, त्यांनी आपली तक्रार मागे घेण्यास नकार दिला, तेव्हा डीएसपीने त्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवून तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. या सर्व प्रकारानंतर पीडित व्यावसायिकाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, डीएसपी कल्पना वर्मा यांनी मात्र हे सर्व आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे सांगून कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी आपण तयार असल्याचे म्हटले आहे.

2 कोटी रुपये, दागिने आणि कार घेतल्याचा व्यावसायिकाचा दावा

व्यावसायिक दीपक टंडन यांच्या दाव्यानुसार, त्यांची आणि डीएसपी कल्पना वर्मा यांची भेट सन 2021 मध्ये झाली होती. हळूहळू त्यांच्यातील संबंध अधिक घट्ट होत गेले. दीपक यांचा आरोप आहे की, या संबंधादरम्यान डीएसपी त्यांच्याकडे सातत्याने पैशांची मागणी करत होत्या. त्यांनी हळूहळू डीएसपी यांना एकूण 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम दिली.

Advertisement

(नक्की वाचा : Health Crisis: महाराष्ट्रात होतंय बाण,बांबू आणि ब्लेडने बाळंतपण! बाळंतिणीला दिली जाते मोहाची दारु! )
 

दीपक टंडन यांनी असाही आरोप केला आहे की, त्यांनी डीएसपींना 12 लाख रुपये किमतीची हिऱ्याची अंगठी, 5 लाख रुपये किमतीची सोन्याची चेन आणि टॉप्स, तसेच 1 लाख रुपये किमतीचे ब्रेसलेट भेट म्हणून दिले.

याव्यतिरिक्त, डीएसपी यांनी त्यांच्याकडून एक इनोव्हीा क्रिस्टा कार देखील घेतली. व्यावसायिकाच्या म्हणण्यानुसार, डीएसपीची मागणी इथेच थांबली नाही. डीएसपी यांनी त्यांच्या भावाच्या नावावर रायपूरच्या व्हीआयपी रोडवरील त्यांचे एक हॉटेल देखील हस्तांतरित करून घेतले आणि नंतर 30 लाख रुपये खर्च करून ते हॉटेल स्वतःच्या नावावर करून घेतले.

Advertisement