अनेक जण प्रेमात पडतात. प्रेम म्हणजे एक सुंदर बाब आहे. असं असताना या प्रेमात काही जण अशी काही भयंकर कृत्य करतात की प्रेम करावं की नाही असा प्रश्न पडतो. प्रेमात इतकी क्रुरता असू शकते याचा उदाहरण समोर आलं आहे. दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका माथेफिरू प्रियकराने आपल्या प्रेयसीचा खून केला आहे. त्याने ज्या पद्धतीने तिचा खून केला ते पाहात अंगाचा थरकाप उडाल्या शिवाय राहाणार नाही. या आरोपीला पोलिसांनी अटक ही केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आरोपी आपल्या प्रेयसीला एका ठिकाणी घेऊन गेला. नंतर चाकूने भोसकून तिची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जहांगीरपुरीच्या संजय वन परिसरात ही घटना घडली माथेफिरू प्रियकराने आपल्या 20 वर्षीय प्रेयसीची हत्या केली. आरोपी आपल्या प्रेयसीला जहांगीरपुरीहून संजय वन परिसरात घेऊन गेला होता. यानंतर आरोपीने आपल्या प्रेयसीच्या शरीरावर एकामागोमाग एक चाकूने अनेक वार केले.
आपल्या प्रेयसीवरील या व्यक्तीचा राग इतका होता की, चाकूने अनेक वार करूनही तो थांबला नाही. आरोपीने चाकूने अनेक वार केल्यानंतर आपल्या प्रेयसीला जाळण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे की, आरोपी आणि मृत तरुणी दोघेही जहांगीरपुरी परिसरातीलच रहिवासी आहेत. ते एकमेकांना ओळखतात. शिवाय ते रिलेशनशिपमध्ये ही होते.
मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी रविवारी दिल्ली पोलिसांत अपहरणाची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी मृत तरुणीचा शोध सुरू केला. पोलिसांनी मृत तरुणीचा मृतदेह संजय वन परिसरातून ताब्यात घेतला आहे. तसेच, मेहरौली पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपीलाही अटक केली आहे. त्याने आपल्या प्रेयसीला इतक्या वाईट पद्धतीने का संपवलं या मागचं खरं कारण आता पोलिस शोधत आहेत. त्यातून काही धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.