प्रियकराच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या आईने आपल्याच मुलीची निर्दयीपणे हत्या केली. आरोपी महिला रोशनी खानने तिचा प्रियकर उदित जयस्वालसोबत मिळून पाच वर्षांच्या मुलीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिनं पतीलाच या प्रकरणात फसवण्याचा प्रयत्न केला. ती प्रेमात इतकी आंधळी झाली होती की मुलीचा जीव घेतल्यानंतर ती प्रियकरासोबत हॉटेलमध्ये पार्टी करत होती. उत्तर प्रदेशातील लखनौमधील हे धक्कादायक प्रकरण आहे.
का केली मुलीची हत्या?
रोशनी खान आणि तिचा प्रियकर उदीत जयस्वाल यांच्या प्रेमात तिची 5 वर्षांची मुलगी अडचण ठरत होती. ती आपले अनैतिक संबंध उघड करेल अशी रोशनीला भीती होती. त्यामुळे तिला मार्गातून दूर करण्याचा त्यांनी कट रचला. मिळालेल्या माहितीनुसार, रोशनी खानने तिचा प्रियकर उदित जयस्वालसोबत मिळून आधी आपल्या मुलीला मारहाण केली आणि नंतर तिचा गळा दाबून खून केला. हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह एका बॅगेत बंद करून ठेवला. ही घटना 13 जुलैच्या रात्रीची आहे. हत्या केल्यानंतर रोशनी आणि उदित यांनी घर बंद केले आणि लखनौमधील एका हॉटेलमध्ये गेले. तिथे दोघांनी दारू पिली आणि रात्रभर पार्टी केली.
( नक्की वाचा: 'सर्व हिंदूंचा हिशेब केला जाईल', योगी सरकार गेल्यावर.... सक्तीनं धर्मांतर करणाऱ्या छांगूरच्या गुंडांची धमकी )
रोशनीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून सांगितले की, तिच्या मुलीला तिच्या पतीनेच मारले आहे. परंतु, पोलिसांच्या तपासात सत्य बाहेर आले.
मुलीला बॉक्समध्ये ठेवले
रोशनीने तिच्या प्रियकरासोबत मिळून 5 वर्षांच्या मुलीचा गळा दाबून खून केला. प्रेमात वेड्या झालेल्या रोशनीने मुलीच्या शरीरावर पाय ठेवले. त्यानंतर तिला पलंगाच्या बॉक्समध्ये बंद करून ठेवले. मृतदेहातून वास येऊ लागल्यावर तो बाहेर काढून एसीसमोर ठेवला. आपण घरामध्ये राहणं सुरक्षित नाही, असं रोशनीला वाटलं. त्यानंतर तिनं घराला कुलूप लावले. ती उदितसोबत लखनौमधीलच एका हॉटेलमध्ये गेली.
पोलीस अधिकारी विश्वजीत श्रीवास्तव यांनी सांगितले की, रोशनी आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर शाहरुखच्या घरीच राहत होते. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मुलीच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात रोशनी आणि तिच्या लिव्ह-इन पार्टनरच्या जबाबांमध्ये विसंगती आढळली. रोशनी आणि उदितसोबत मुलीला राहायचे नव्हते. मुलीला वडिलांसोबत राहायचे होते. तसेच, रोशनी शाहरुखला फसवून त्याचे घर हडपण्याचाही प्रयत्न करत होती.
रोशनीचे सासरच्या लोकांशीही आधीपासूनच पटत नव्हते. तिने यापूर्वीही सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हे लक्षात घेऊन रोशनीने 13 जुलै रोजी मुलीची हत्या करून आपला पती शाहरुखला फसवण्याचा कट रचला. मुलीची हत्या करण्यापूर्वी तिला मारहाणही करण्यात आली होती. रोशनीने मुलीच्या पोटावर पाय ठेवला आणि उदितने मुलीचे तोंड दाबून धरले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. यानंतर सकाळी लवकर दोघे उठून घराला कुलूप लावून लखनौमध्ये फिरत राहिले आणि एक-दोन ठिकाणी दारूही पिली. यानंतर दोघे एका हॉटेलमध्ये थांबले आणि मग संपूर्ण कथा रचून रोशनीने शाहरुखवर मुलीच्या हत्येचा आरोप लावला.