योगेश लाटकर, प्रतिनिधी
Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीच्या निमित्तानं घराघरात तसंच भंडाऱ्यामध्ये भगरीचा महाप्रसाद केला जातो. मात्र भगरीमुळे अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता अधिक असल्याने नागरिकांनी सावध राहावे, भगरीचे सेवन टाळावे, काळजी घ्यावी, असा इशारा आरोग्य प्रशासनाने दिला आहे.
गेल्या वर्षी भगर खाल्ल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विषबाधा झाली होती. दोन हजारावर लोकांना भगरीच्या विष बाधेने संकटात आणले होते. त्यामुळे महाशिवरात्रीला भगवान शंकराचे पूजन करताना उपवासासाठी अन्य पदार्थ वापरावे. भगर खाणे उपवासासाठी टाळावे,अशी सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक आवाहन जनतेला केले आहे. गेल्यावर्षी लोहा अर्धापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विषबाध्येच्या घटना भगरीमुळे झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर हे आवाहान करण्यात आले आहे.
भगरीमध्ये मोठ्या प्रमाणात अस्परलिस जातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युनिगाक्लेविन यासारखी विष द्रव्य (टॉक्सिन ) तयार होतात.ऑक्टोबर महिन्यातील तापमान आणि आद्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. त्यामुळे भगर खाताना काळजी घ्या, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
( नक्की वाचा : Mahashivratri 2025 : लातूरच्या 700 वर्ष जुन्या सिद्धेश्वर मंदिराचा काय आहे इतिहास? महाशिवरात्रीच्या रात्री जपलीय खास परंपरा )
- भगर खाणे टाळणे शक्य नसेल तर काळजी घ्यावी अशी सूचना करण्यात आली आहे.
- सुटी भगर दुकानातून घेऊ नका
- भगर घरी आणली असेल तर कोरड्या ठिकाणी झाकण बंद डब्यात ठेवा.
- वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही याची काळजी घ्या.
- शक्यतो भगरीचे पीठ विकतच आणू नका.
- भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते.त्यामुळे या पिठाला बुरशीची लागण होते.
भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिन युक्त पदार्थ आहेत. दोन ते तीन दिवस सलग उपवास असताना या पदार्थांचे सेवन ऍसिडिटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी मळमळ व पोटाचे त्रास होतात. या पदार्थाचे सेवन पचन शक्तीनुसार मर्यादितच करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
विक्रेतांनाही कडक सूचना...
विक्रेत्यांनी पॅक बंद भगरचीच विक्री करावी भगर करीत खरेदी करताना घाऊक विक्रेत्यांकडून पावती घ्यावी भगरीचे पॅकेट पोत्यावर उत्पादकांचा पत्ता परवाना क्रमांक पॅकिंग दिनांक अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घ्यावी मुदतबाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करू नये अशा पद्धतीची नियमबाह्य विक्री करणारे आढळल्यास त्यांच्यावर अन्नसुरक्षा का व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.