उत्तर प्रदेशातल्या मैनपूरी इथं अशी एक घटना घडली आहे ज्याची चर्चा संपुर्ण राज्यात केली जात आहे. ज्याच्यावर बलात्काराचा आरोप केला, त्याच्या बरोबर मंदिरात सातजन्म राहाण्याची शपथ घेत लग्न गाठ बांधली.मैनपूरीच्या कोतवाली गावातल्या शितला देवी मंदीरात हा लग्न सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या आधी या दोघांमध्ये कोर्टकचेरीही झाली होती. शिवाय भांडणं ही नित्याचीच झाली होती. पण काहींनी दोघांमध्ये मध्यस्थी करत त्यांना लग्नासाठी तयार केलं. अखेर दोघांनी लग्नाची तयारी दाखवली आणि वादावर पडदा टाकला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अनुराग हा तरुण लखनौमध्ये पोलिस दलात कार्यरत आहे. तीन वर्षापूर्वी त्याची मैनपूरी इथल्या तरुणीशी ओळख झाली. पुढे दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे दोघे जण लखनौमध्ये लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. पणनंतर दोघांमध्ये खटके उडायला लागले. भांडणं वाढू लागली. अनुराग ही तिला टाळू लागला. 2023 मध्ये त्या तरुणीने थेट पोलिस दलात कार्यरत असलेल्या अनुराग विरोधातच बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
याची माहिती मिळताच अनुरागला राग अनावर झाला. तो थेट तिच्या घरी धडकला. त्याने घरी तिला धमकावले. शिवाय घरात तोडफोड ही केली. त्यामुळे दोघांमधील तणावर अधिकच वाढला. त्यावेळी तिने पोलिसांना कॉल केला होता. पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अनुरागला अटकही केली होती. अशा स्थिती दोघांमधली दरी कमी करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी दोन मित्रांनी त्यासाठी पुढाकार घेतला.
दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला. अनुरागवर बलात्काराचा गुन्हा संबधीत तरुणीने दाखल केला होता. तो मागे घेण्याची तयारी तिने दर्शवली. शिवाय लग्नासाठी तयार असल्याचंही तिने सांगितलं. या लग्नाला त्यांच्या कुटुंबीयांची मात्र सहमती नव्हती. त्यामुळेच ते या लग्नाला हजर राहीले नाहीत. मुलीची बहिण मात्र या लग्नाला उपस्थित होती. आम्ही लिव्ह इन मध्ये होतो. त्यानंतर काही काळ वाद झाला. पुढे समाजाचे टोमणेही ऐकावे लागले. त्यामुळे आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला असं यावेळी अनुराग यांनी स्पष्ट केलं.