लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी
Jalna Crime News : जालन्यात एक भयंकर घटना घडल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून 28 वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलांवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथे हा संतापजनक प्रकार घडला. या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. निलेश निशिकांत कुलकर्णी (28) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 18 जानेवारी 2026 रोजी रविवारची सुट्टी असल्याने पीडित 13 वर्षीय अल्पवयीन मुलगा गावात खेळत होता. त्यावेळी आरोपीने त्या मुलासह त्याच्या मित्रांना चॉकलेटचे आमिष दाखवले आणि त्याच्या राहत्या घरी बोलावून घेतले. मुलं रुममध्ये आल्यानंतर आरोपीने दरवाजा बंद करून मुलांना कपडे काढण्यास सांगितले आणि त्याने त्यांच्यासोबत अश्लील कृत्य केलं, असा आरोप आहे.
नक्की वाचा >> Sangli News: आईने केली 2 लेकरांची 20-20 हजारात विक्री, तिसऱ्या मुलीचा ही होता प्रश्न, पण पुढे जे घडलं ते...
मुलाचा हात पकडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि..
आरोपीने पीडित मुलगा व त्याच्या मित्रांसोबत गैरवर्तन करत त्यांच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, असं तक्रारीत म्हटलं आहे. पीडित मुलांनी नकार दिल्यानंतर आरोपीने मुलाचा हात पकडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यासोबत अश्लील वर्तन केले. तसेच आरोपीने त्या अल्पवयीन मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे.
दरम्यान, पीडित मुलाने घडलेल्या प्रकाराबाबत त्यांच्या पालकांना माहिती दिली. त्यानंतर घनसावंगी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक ए.के.ढाकणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान,जांबसमर्थ गावात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.