Shocking Love Story : ग्रेटर नोएडामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने कोरियाच्या प्रियकराची चाकूने वार करून हत्या केली. लुंजेना पमाई असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी तरुणी मणिपूरची रहिवासी आहे. तर 'डक ही यू'असं हत्या झालेल्या दक्षिण कोरियाच्या नागरिकाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही एटीएस पायस हाइड वेज,सेक्टर 150,नॉलेज पार्क गौतमबुद्ध नगर येथे राहत होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे.मृत व्यक्ती एका मोबाईल कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होता. दरम्यान, पोलिसांनी आरोपी पमाईची सखोल चौकशी केली आहे.या चौकशीदरम्यान, आरोपीने धक्कादायक खुलासे केले आहेत. आरोपी तरुणीने म्हटलं की,डक ही यू दारू पिऊन तिला सतत मारहाण करायचा. त्याच्या अशा वागणुकीमुळे मी त्रस्त झाली होती. त्यामुळे आमच्यात वादविवाद झाले होते. त्यानंतर अशाप्रकारची घटना घडली.
नक्की वाचा >> पुण्यातून अल्पवयीन मुलीला पळवलं..पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी इन्स्टाग्रामच्या एका 'क्लू'मुळे सापडला!
आरोपी तरुणीनेच प्रियकराला नेलं रुग्णालयात
पोलीस तपासात अशी माहिती उघड झाली की,आरोपीने प्रियकरावर चाकूने हल्ला केल्यानंतर त्याला स्वतः रुग्णालयात नेले होते.पण रुग्णालयात डक ही यूचा उपचार सुरू होण्याआधीच मृत्यू झाला.पोलिसांना आता पोस्टमार्टम अहवालाची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी पीडिताच्या घरातून अनेक महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेतले आहेत. या पुराव्यांची तपासणी केली जात आहे.
नक्की वाचा >> मुंबईला स्वप्नांची मायानगरी का म्हणतात? घर सोडून मुंबईत गेलेल्या तरुणानं करून दाखवलं, Video पाहून हिंमत वाढेल
दारू पार्टीत नेमकं काय घडलं?
आरोपीने पोलिसांना दिलेली माहिती अशी की,रात्री दोघे दारू पार्टी करत होते आणि या दरम्यान काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला.वादानंतरच प्रेयसीने प्रियकराच्या छातीत वार केला. प्रियकर रक्तबंबाळ झाल्यानंतर प्रेयसीने त्याला ग्रेटर नोएडाच्या जिम्स रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर याप्रकरणाची माहिती नॉलेज पार्क पोलीस ठाण्याला देण्यात आली. आरोपी मुलीने पोलिसांना सांगितले की, तिचा प्रियकराला मारण्याचा हेतू नव्हता.पण रागाच्या भरात ही घटना घडली.पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून तपास सुरू केला आहे.