Meghalaya honeymoon Couple Missing Case: इंदूर येथील हनिमूनला गेलेले कपल बेपत्ता झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. 11 दिवसांनी पती राजा रघुवंशीचा मेघालयामध्ये मृत्यू सापडला होता मात्र पत्नी सोनम बेपत्ता असल्याने पोलीस तिचा शोध घेत होते. या प्रकरणात आता सर्वात धक्कादायक अपडेट समोर आली असून राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उत्तरप्रदेशमधील गाझीपूरमधून सोनम सापडली असून तिच्यासह आणखी तिघांना ताब्यात घेण्यात आल्याचे समोर आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर सविस्तर माहिती अशी की, मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये राहणारे नवविवाहीत जोडपे राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी बेपत्ता प्रकरण सध्या चर्चेत आहे. राज रघुवंशी आणि सोनम रघुवंशी 20 मे रोजी त्यांचा हनिमून साजरा करण्यासाठी गुवाहाटी येथे गेले होते. तेथून ते फिरायला शिलाँगमध्ये गेले होते. तेव्हापासून दोघेही बेपत्ता होते. 3 जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला मात्र पत्नी सोनम अद्याप बेपत्ता होती.
राजासोबत नववधू सोनमचीही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र या प्रकरणात आता सर्वात मोठा आणि खळबळजनक ट्वीस्ट आला असून पत्नी सोनमला ताब्यात घेण्यात आले आहे. उत्तरप्रदेशमधील गाझीपूरमध्ये सोनमने आत्मसमर्पण केले असून तिच्यासह आणखी तिघांना ताब्यात घेण्यात आल्याचे समोर आले आहे. पत्नी सोनमनेच राजा रघूवंशीची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ना गाजीपूरमधील एका ढाब्यातून सोनम रघुवंशी सापडली आहे. या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. मेघालयच्या डीजीपींनी दावा केला आहे की त्या प्रकरणात 4 जणांना अटक करण्यात आली आहे. राजा रघुवंशीच्या हत्येत पत्नी सोनम सहभाग असून तिने सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.