Meghalaya Murder: राजा रघुवंशीच्या खूनाचा छडा कसा लागला? एका टुरिस्ट गाइडमुळे सोनमचा खेळ खल्लास झाला

राजा आणि सोनमचं लग्न 11 मे रोजी झालं होतं. दोघे 20 मे रोजी हनिमूनसाठी मेघालयला रवाना झाले होते.

जाहिरात
Read Time: 3 mins

Meghalaya Honeymoon Murder Case: राजा रघुवंशी हा आपली पत्नी सोनम बरोबर मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेला होता. या ट्रिपमध्ये राजाची हत्या झाली. पण पत्नी सोनम गायब होती. तिचा काही पत्ता लागत नव्हता. या प्रकरणी आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राजाची हत्या त्याची पत्नी सोनम हीनेच केल्याचं आता समोर आलं आहे. तिने या प्रकरणी आता आत्मसमर्पण ही केलं आहे. तिला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून अटक केली आहे. शिवाय तिच्या इतर तीन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. एक जण अजूनही फरार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिस आता राजाच्या हत्येप्रकरणी नवनवीन खुलासे करत आहेत. पण पोलिसांच्या खुलाशांच्या काही दिवसांपूर्वी, एका टुरिस्ट गाईडने पोलिसांना एक महत्त्वाचा सुगावा दिला होता. त्याने सांगितलं होतं की त्याने राजा रघुवंशीला तीन लोकांसह आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशीसोबत फिरताना पाहिलं होतं. हा खुलासा तपासात एक महत्त्वाचा दुवा ठरला. कारण पोलिसांना खात्री झाली की हत्येच्या या प्रकरणात फक्त सोनमच नाही, तर इतर तीन लोकही सहभागी असू शकतात.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Raja Raghuvanshi Murder Case: हनिमून हत्याकांड! नव्या नवरीनेच दिली पतीची सुपारी? पत्नी सोनमसह 3 ताब्यात

पीटीआयने शनिवारी सांगितलं होतं की, मावलखियात येथील पर्यटक गाईड अल्बर्ट पाडे याने रघुवंशी आणि त्याच्या पत्नीला बेपत्ता होण्याच्या दिवशी तीन लोकांसोबत पाहिलं होतं. अल्बर्टने सांगितलं की, त्याने 23 मे रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास नोंगरियात ते मावलखियातपर्यंत 3,000 हून अधिक पायऱ्या चढताना या जोडप्याला पाहिलं होतं. त्यावेळी त्यांच्या सोबत तीन लोक होते. गाईडने सांगितलं की त्याने या जोडप्याला ओळखलं. कारण आदल्या दिवशी त्याने त्यांना नोंगरियातमधील प्रसिद्ध ‘लिव्हिंग रूट्स ब्रिज' पाहण्यासाठी सांगितलं होतं. परंतु त्यांनी नकार दिला होता. शिवाय त्यांनी दुसऱ्या गाईडला सोबत घेतलं होतं.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Raja Raghuvanshi Case : हनिमून ते हत्या… पत्नी सोनम सापडली, राजा रघुवंशी प्रकणात दोन आठवड्यात काय घडलं?

Advertisement

रघुवंशीचा मृतदेह ‘वेइसाडोंग फॉल्स' जवळ एका खड्ड्यात सापडला होता. त्याची एक सोन्याची अंगठी आणि चेन गायब होती. त्यामुळे हत्येचा संशय आणखी वाढला. एक दिवसानंतर, जवळच रक्ताने माखलेला एक चाकू सापडला. दोन दिवसांनंतर जोडप्याने वापरलेल्या रेनकोट सापडला. त्या  खड्ड्यात रघुवंशीचा मृतदेह सापडला होता, त्या मावकामा गावात तो सापडला होता. 

ट्रेंडिंग बातमी - Sonam Raghuvanshi: खळबळजनक! हनीमूनला गेलेल्या राजा रघुवंशीला पत्नीनेच संपवलं? 7 दिवसांनी सोनमला अटक

राजा आणि सोनमचं लग्न 11 मे रोजी झालं होतं. दोघे 20 मे रोजी हनिमूनसाठी मेघालयला रवाना झाले होते. ते 22 मे रोजी भाड्याच्या स्कूटरवर मावलखियात गावात पोहोचले. त्यांची स्कूटर 24 मे रोजी शिलाँग ते सोहरा जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका कॅफेमध्ये बेवारस अवस्थेत सापडली. त्यानंतर त्यांचा शोध सुरू झाला. आता मेघालय पोलिसांनुसार, सोनमने यूपीच्या गाझीपूरमध्ये स्वतः पोलिसांकडे जाऊन आत्मसमर्पण केलं आहे. एकीकडे सोनमच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या निर्दोष असण्याचा दावा केला आहे. तर राजाच्या भावाने सांगितलं की, जर सोनम दोषी आढळली तर तिला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे.