नियम धाब्यावर बसवून अल्पवयीन मुलीचा गर्भपात! नर्सिंग ऑफिसरने उकळले 16,000 रुपये

तपास पथकासमोर साक्षीदारांनी स्पष्ट केले की, नर्सनेच 'सफाई' करण्याच्या नावाखाली पैसे घेतले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

Minor Abortion Case: सरकारी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय नैतिकतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन आणि अविवाहित मुलीचा गर्भपात नियमांना हरताळ फासून करण्यात आला. विशेष म्हणजे, एका नर्सिंग ऑफिसरने अधिकृत डॉक्टरांच्या परवानगीशिवाय हा अवैध प्रकार केला. त्यासाठी 16,000 रुपयांची लाच घेतल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. मध्य प्रदेशातल्या छतरपूरमध्ये हा खळबळजनक प्रकार घडला आहे. 

या प्रकरणाचा खुलासा तांत्रिक देखरेख आणि सखोल तपासणीनंतर झाला आहे. नर्सिंग ऑफिसर प्रीती दुबे यांनी हा गर्भपात केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नियमानुसार गर्भपात केवळ अधिकृत डॉक्टरांच्या देखरेखीखालीच होऊ शकतो. मात्र येथे एमटीपी (MTP) कायद्याच्या सर्व तरतुदींचे उल्लंघन करण्यात आले. नर्सिंग ऑफिसर प्रीती दुबे यांनी सुरुवातीला हा गुन्हा नाकारला होता. मात्र, डॉक्टर एस. प्रजापती आणि डॉक्टर सुरेखा खरे यांच्या समितीने केलेल्या चौकशीत सत्य बाहेर आले आहे.

Advertisement

नक्की वाचा - Shocking news: शाळेच्या कार्यक्रमात पाकिस्तानी गीत? तक्रार दाखल, शाळेचे म्हणणे काय?

आरोग्य विभागाने नेमलेल्या तपास समितीने अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना कोणतीही माहिती न देता आणि बनावट संदर्भांचा वापर करून हा गर्भपात उरकला गेला. भोपाळ स्तरावरून झालेल्या पुनरावलोकनानंतर आता संबंधित नर्सिंग ऑफिसरवर कठोर कारवाईचे संकेत मिळत आहेत.

नक्की वाचा - Shocking news: खड्ड्याने 6 वर्षाच्या चिमुकलीचा जीव घेतला!, खेळता खेळता घात झाला, जबाबदार कोण?

तपास पथकासमोर साक्षीदारांनी स्पष्ट केले की, नर्सनेच 'सफाई' करण्याच्या नावाखाली पैसे घेतले होते. इतकेच नाही तर दुसऱ्या डॉक्टरांच्या नावाची बनावट स्लिपही तयार करण्यात आली होती. अल्पवयीन मुलीच्या भविष्याशी खेळणाऱ्या या नर्सिंग ऑफिसरला आता दोषी ठरवण्यात आले आहे. भोपाळच्या आरोग्य संचालकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून लवकरच अटकेची किंवा निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.