Missing child: 4 वर्षाचा चिमुकला, 72 तासापासून गायब, घनदाट जंगलात ड्रोनद्वारे शोध, अखेर...

1 जानेवारीला सकाळी चिमुकला नील गायब झाला. त्याची आई घाबरली. त्यांनी ही माहिती आपल्या भावाला दिली.

जाहिरात
Read Time: 2 mins
भंडारा:

नील मनोज चौधरी. वय अवघं चार वर्षाचं. हा चिमुकला भंडार जिल्ह्यातील तुमसर जवळील चिखला यागावात राहाणार. हा 1 जानेवारी घरा बाहेर अंगणात खेळत होता. त्याची आई बाहेर कामाला गेली होती. त्यामुळे तो बाहेर खेळत होता. आई संध्याकाळी घरी आली. त्यावेळी नील घरा बाहेर दिसला नाही. त्याची शेजाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली. पण कोणाला काहीच माहित नव्हतं. त्यामुळे त्याची आई घाबरली. चिखली हे गाव घनदाट जंगलात आहे. शिवाय इथं हिस्त्र प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे सर्वच जण घाबरून गेले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

1 जानेवारीला सकाळी चिमुकला नील गायब झाला. त्याची आई घाबरली. त्यांनी ही माहिती आपल्या भावाला दिली. सर्व जण त्याला शोधू लागले पण त्याचा काहीच पत्ता लागला नाही. शेवटी जवळच्या गोबरवही पोलीस स्थानकात त्यांनी धाव घेतली. त्यांनी ही त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण 72 तास उलटून गेले तरी नीलचा कुठेच पत्ता लागला नाही. पोलिसांनी चिखला परिसरात नाकेबंदी केली. जवळची मध्यप्रदेश राज्यांची सीमा लागून असल्याने पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने शोध मोहीम राबवली.

ट्रेंडिंग बातमी - तक्रारदार तरुणीला बाथरूममध्ये नेलं, पँटची चेन उघडली आणि..पोलीस अधिकाऱ्याचे धक्कादायक कृत्य

चिखला हे गाव घनदाट जंगलात वसलेलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिस्त्र प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे नीलची शिकार झाली नसेल ना असा प्राथमिक अंदाज सुद्धा वर्तविला जात होता. त्यानंतर पोलिसांनी वन विभागाची मदत घेण्याचे ठरवले.  पोलीस प्रशासन आणि  वन विभागाने ड्रॉनच्या सहाय्याने चिमुकल्याचा शोध  घेणे सुरू केलं. नीलला गायब होवून 72 तास झाले होते. पण त्याचा शोध काही लागत नव्हता. शेवटी ड्रोनच्या कक्षेत तो दिसला. तिन दिवसानंतर नील सापडला. 

ट्रेंडिंग बातमी - Mukesh Chandrakar: भ्रष्टाचार उघड करणारे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची हत्या, मृतदेह सेप्टिक टँकमध्ये फेकला

चिखला माईन परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या डोंगरावर एका झाडाखाली तो पोलीस व वन विभागाच्या चमूला आढळून आला. सध्या नील हा सुखरूप असून त्याला कुठलाही प्रकारच्या जखमा झालेल्या नाहीत. त्यामुळे नीलच्या घातपात करण्याच्या प्रयत्न तर नव्हता ना असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. सध्या नीलला  प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहे. पुढील चौकशी व तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक नरुल हसन यांनी सांगितले आहे. मात्र तीन दिवस नील जंगलात झाडाखाली कसा राहिला हे रहस्य अजूनही उलगडलेले नाही.  

Advertisement