Mumbai Education Scam : सावधान! तुमच्या मुलाला परदेशात पाठवताय? मुंबईत 19 पालकांना बसला 3 कोटींचा फटका

Charkop Fraud Case :परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Charkop Fraud Case :मुंबईतील चारकोप परिसरातील एका नामांकित एजन्सीने उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे
मुंबई:

ऋतिक घनकवार, प्रतिनिधी

Mumbai Education Scam : परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. मुंबईतील चारकोप परिसरातील एका नामांकित एजन्सीने उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आता अधिकच वाढले असून, नवीन तक्रारदार समोर आल्यामुळे फसवणुकीचा आकडा देखील मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. 'करिअर अँड ऑप्शन्स सर्व्हिस लिमिटेड' या एजन्सीने अनेक कुटुंबांची आयुष्यभराची पुंजी हडपल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

फसवणुकीचा आकडा तीन कोटींच्या घरात

डिसेंबर महिन्यात या फसवणुकीचे प्रकरण पहिल्यांदा समोर आले होते. त्यावेळी केवळ 13 तक्रारदारांनी चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र, आता या तक्रारदारांची संख्या 19 वर पोहोचली आहे. सुरुवातीला फसवणुकीची रक्कम 1 कोटी 75 लाख रुपयांच्या आसपास असल्याचे दिसत होते, परंतु आता नवीन तक्रारदारांमुळे हा आकडा 2 कोटी 87 लाख रुपयांपर्यंत गेला आहे. 

फसवणुकीचे हे जाळे केवळ मुंबईपुरते मर्यादित नसून, नाशिकमधील एका विद्यार्थ्यालाही या एजन्सीने आपल्या जाळ्यात ओढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

( नक्की वाचा : Dombivli: डोंबिवलीत राजकीय संघर्षाला धार; भाजपा कार्यकर्त्यावरील हल्लाप्रकरणी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना अटक )
 

मुख्य आरोपींचा ओरिसाला पळ

या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार करिअर अँड ऑप्शन्स सर्व्हिस लिमिटेडचे मालक स्टेला मेहता आणि राकेश मेहता हे दाम्पत्य आहे. पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे. सध्या मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या दोघांनी पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी ओरिसा राज्यामध्ये पळ काढल्याचे समजते आहे. 

पोलीस पथक या आरोपींच्या मागावर असून लवकरच त्यांना बेड्या ठोकल्या जाण्याची शक्यता आहे. या दाम्पत्याने अनेक पालकांचा विश्वास संपादन करून त्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे खोटे आश्वासन दिले होते.

Advertisement

( नक्की वाचा : Online Game: 'आम्ही भारतीय नाही, कोरियन आहोत!' 3 सख्ख्या बहिणींच्या मृत्यूचं कारण ठरलेला तो गेम आहे तरी काय? )

तक्रारदार आणि त्यांच्या फसवणुकीचा सविस्तर तपशील

या प्रकरणात आतापर्यंत समोर आलेल्या 19 तक्रारदारांची नावे आणि त्यांच्याकडून उकळलेली रक्कम पुढीलप्रमाणे आहे. हर्षद दवे यांची सर्वाधिक म्हणजे 38,67,996 रुपयांची फसवणूक झाली आहे, तर स्वाती दरेकर यांनी 39,97,918 रुपये गमावले आहेत. इतर तक्रारदारांमध्ये मुकेश पाटील 22,00,000 रुपये, दिलीप अग्रवाल 22,21,154 रुपये, देवांश 20,94,000 रुपये आणि शैलेश पानचाळ 18,24,693 रुपये यांचा समावेश आहे.

तसेच एडविन 17,50,000 रुपये, किंबर्ली लोबो 16,91,000 रुपये, अनिल अथर्व गावंडे 14,85,492 रुपये, दिलीप पटेल 14,82,000 रुपये, मोहम्मद रिजवी 13,00,000 रुपये, नेहल जोशी 11,00,000 रुपये आणि रेणुका मेनन 10,00,000 रुपये अशा रकमा या एजन्सीने घेतल्या आहेत. याशिवाय महेंद्र देढिया 9,00,000 रुपये, सायली परब 4,60,000 रुपये, मुस्कान लुल्ला 3,85,000 रुपये, संदीप डुस्तकार 3,20,000 रुपये आणि मुकेश मुदहोळकर 2,75,000 रुपये अशा एकूण 2,83,54,253 रुपयांच्या फसवणुकीची नोंद झाली आहे.

Advertisement

परदेश शिक्षणासाठी सतर्क राहण्याचे आवाहन

परदेशात शिक्षणासाठी जाताना कोणत्याही एजन्सीची पूर्ण चौकशी करणे आवश्यक असल्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. केवळ जाहिरातींना बळी न पडता संबंधित विद्यापीठांशी थेट संपर्क साधणे किंवा अधिकृत प्रतिनिधींची पडताळणी करणे गरजेचे आहे. चारकोप पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आणखी काही विद्यार्थी या फसवणुकीला बळी पडले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.
 

Topics mentioned in this article