अक्षय कुमारच्या नावावर फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी घातल्या बेड्या

आरोपीनं स्वत:चं नाव 'रोहन मेहरा' असल्याचं सांगितलं होतं. त्याचबरोबर तो अक्षय कुमारचे प्रॉडक्शन हाऊस केप ऑफ गुड फिल्मसचा कर्मचारी असल्याचा दावा करत होता

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो
मुंबई:

अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) नावावर फसवणूक करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. प्रिन्स कुमार सिन्हा (वय 29) असं या व्यक्तीचं नाव आहे. आरोपीवर पूजा आनंदानी या महिलेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पण त्या सावध असल्यानं त्यांची फसवणूक झाली नाही. आरोपीनं स्वत:चं नाव 'रोहन मेहरा' असल्याचं सांगितलं होतं. त्याचबरोबर तो अक्षय कुमारचे प्रॉडक्शन हाऊस केप ऑफ गुड फिल्मसचा कर्मचारी असल्याचा दावा करत होता, अशी माहिती जुहू पोलिसांनी दिली आहे. 

काय आहे प्रकरण?

आरोपीनं निर्भया प्रकरणावर चित्रपटात सहभागी असल्याचा दावा करत आनंदानी यांना काम करण्याची ऑफर दिली होती. त्याचबरोबर आनंदानी यांना जुहूमध्ये भेटायला बोलावलं. तेथील कॉफी शॉपमध्ये त्यांची पहिली भेट झाली. त्यावेळी त्यानं आपला अमिताभ बच्चन यांच्याशी संपर्क असल्याचा दावा करणाऱ्या एका फोटोग्राफरसाठी फोटो काढण्यास तिला सांगितलंय. त्यानंतर त्यानं पुन्हा एकदा जुहूमधील जेडब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये भेटण्याची व्यवस्था केली होती. त्यावेळी आनंदानी यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली होती. 

हार्दिक पांड्याच्या भावाला मुंबई पोलिसांनी केली अटक
 

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करत प्रिन्सला अटक केली. जुहू पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार 3 एप्रिल रोजी आरोपीनं मोबाईल फोनचा वापर करुन रोहन नावं या आनंदानी यांच्याशी संपर्क केला होता. तसंच स्वत: 'केप ऑफ गुड फिल्म्स' चा कर्मचारी असल्याचं सांगितलं होतं. या नावाचा कोणताही व्यक्ती प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करत नसल्याचं तपासात स्पष्ट झालं. त्यानंतर आनंदानी यांनी प्रोडक्शन हाऊसला त्याबाबत कल्पना दिली तसंच जुहू पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. 

चित्रपट उद्योगात चालणारे फसवणुकीचे प्रकार या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आला आहे. आनंदानी यांनी दाखवलेल्या हुशारीचं जुहू पोलिसांनी कौतुक केलं आहे. त्याचबरोबर या प्रकरणात सावधगिरी बाळगा तसंच पडताळणी करा असा सल्ला दिला आहे. 

Advertisement