एक-दोन नाही तर 30 महिलांशी लग्न? 'लखोबा लोखंडे' असा अडकला जाळ्यात

फिरोज शेख याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि गुजरात मध्ये देखील आतापर्यंत 25 ते 30 महिलांना गंडा घातला आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
वसई:

मनोज सातवी 

नालासोपारा पोलिसांनी आधुनिक काळातल्या नव्या 'लखोबा लोखंडे' ला अटक केली आहे. या लखोबा लोखंडेचे कारनामे ऐकले तर तुम्हीही चक्रावून जाल. कारण त्याने दोन-चार नव्हे, तब्बल 25 ते 30 महिलांशी लग्न केले. तोयावरच थांबला नाही तर त्यांने त्यांना लाखो रुपयांना गंडा ही घातला आहे. फिरोज नियाज शेख  असे या 'लखोबा'चे नाव आहे. त्याने लग्न जुळवणाऱ्या संकेत स्थळावर फेक प्रोफाईल तयार केला होता. तिथे तो  घटस्फोटीत किंवा विधवा महिलांना लक्ष करायचा. लग्न करून त्यांच्याकडून पैसे, दागिने आणि मौल्यवान वस्तू घेऊन फरार व्हायचा. मात्र नालासोपारा पोलिसांनी त्याचीच मोडस ऑपेरेंडी वापरून त्याच्या मुस्क्या आवळल्या आहेत.

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आचार्य अत्रे यांचा 'तो मी नव्हेच' या नाटकातील प्रभाकर पणशीकर यांनी साकारलेला 'लखोबा लोखंडे'ला देखील लाजवेल असे कारनामे या अधुनिक लखोबा लोखंडेने केले आहेत. मेट्रोमोनियल वेबसाईटवर घटस्फोटीत आणि विधवा महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात तो ओढयचा. काहींना तो तो लग्न बेडीतही अडकवायचा. असे करता करता तोच पोलिसांच्या बेडीत कसा अडकला हे त्यालाही कळले नाही. 

ट्रेंडिंग बातमी - हाताची मेंदी जाण्याआधीच कपाळाचं कुंकू गेलं, संभाजीगनर ऑनर किलींगने हादरलं

कारण ज्या पद्धतीने तो मेट्रोमोनीयल वेबसाईटवर फेक प्रोफाइल बनवून महिलांची फसवणूक करायचा, त्याच पद्धतीचा वापर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी केला. नालासोपारा पोलिसांनी देखील एका महिलेच्या नावाने फेक प्रोफाइल बनवून सापळा रचला. या सापळ्यात हा लखोबा लोखंडे अडकला. फिरोज शेख याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि गुजरात मध्ये देखील आतापर्यंत 25 ते 30 महिलांना गंडा घातला आहे. अनेक वेळा जेलच्या वाऱ्या देखील त्याने केल्या आहेत.  

ट्रेंडिंग बातमी -  हाडं तोडली, प्रायव्हेट पार्टवर जखमा, चेहऱ्याचा चेंदामेंदा; उरणमधील यशश्रीविरोधात इतकी क्रूरता का आली?

फिरोज शेख याने एका लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून एका घटस्फोटीत महिलेशी ओळख वाढवली. त्या नंतर तिच्याशी लग्न देखील केले. आपल्या नव्या संसाराची स्वप्न बघणाऱ्या त्या महिलेचा विश्वास त्याने संपादीत केला. फिरोजने तिच्याकडून लॅपटॉप आणि कार घेण्यासाठी 6 लाख 50 हजार 790 रुपये घेतले आणि पसार झाला. आपला नवा जोडीदार फिरोज गायब झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे या महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर तिने थेट नालासोपारा पोलिस ठाणे गाठले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - शिळफाटा : पुजाऱ्यांनी बलात्कार अन् हत्या केलेल्या महिलेला न्याय मिळणार!  मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना 

पोलिसांनी फिरोजचा शोध सुरू केला. मात्र त्याचा नंबर नसल्याने तो पोलिसांना सापडत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी फिरोजचीच गुन्हा करण्याची पद्धत वापरली. एका महिलेच्या नावाने फेक प्रोफाईल बनवून त्याच्याशी सलगी केली. त्याने तिला भेटायला बोलावले. त्यावेळी नालासोपारा पोलिसांनी सापळा रचून या लखोबाला कल्याण मधून जेरबंद केले. त्याच्याकडून अनेक महिलांचे एटीएम कार्ड, चेकबुक, 6 मोबाईल, 1 लॅपटॉप, महिलांचे पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड, दागिने सापडले  आहेत. 3 लाख 21 हजार 490 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

Topics mentioned in this article