Navi Mumbai Crime: कामोठ्यात माय-लेकाच्या हत्येचं गुढ उकललं, आरोपीकडून धक्कादायक खुलासा

पोलिस आल्यानंतर बंद घरामध्ये गीता जग्गी वय वर्ष 70 आणि जितेंद्र जग्गी वय वर्ष 45 यांचे मृतदेह आढळून आले.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी मुंबई:

नवी मुंबई परिसरातील कामोठे येथील  सेक्टर 6 मधील ड्रीम्ज आपार्टमेंटमध्ये माय-लेकाचा मृतदेह आढळला होता. या दोघांचीही हत्या झाल्याचा संशय व्यक्त पोलीस व्यक्त करीत होते. सोसायटी मधील फ्लॅट क्रमांक  104 चा   दरवाजा आतून बंद होता. शिवाय घरातील व्यक्ती काहीही प्रतिसाद देत नाहीत, अशी माहिती कामोठे पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिस आल्यानंतर बंद घरामध्ये गीता जग्गी  वय वर्ष 70 आणि जितेंद्र जग्गी वय वर्ष 45 यांचे मृतदेह आढळून आले. जितेंद्र यांच्या अंगावर जखमा होत्या. त्यामुळे त्यांची हत्या झाली असावी असा संशय पोलिसांना आल्या. त्यानुसार तातडीने तपास सुरू केला. त्यात सर्वात आधी त्यांना सोसायटीच्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून महत्वाची माहिती हाती लागली.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ज्यावेळी पोलिस जग्गी कुटुंबाच्या घरात घुसले त्यावेळी त्यांना दोघांचे ही मृतदेह आढळून आले. त्यावेळी घरातला एलपीजी गॅस लिक करून ही ठेवला होता. त्यामुळे या दोघांच्या मृत्यूचे गुढ वाढले होते.  पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले. त्यात दोन तरुण संशयाच्या भोवऱ्यात आले. पोलिस उपनिरीक्षक अमोल चौगुले यांनी या दोघांची माहिती घेतली. हे दोघेही उलवे परिसरात असल्याचे पोलिसांना समजलो. मग त्यांच्यासाठी सापळा रचण्यात आला. शेवटी त्यांना ताब्यात घेण्यात आले. 

ट्रेंडिंग बातमी - Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणी आता अपात्र ठरणार, निकष ठरले, 'याच' महिलांना मिळणार लाभ

संज्योत मंगेश दोडके आणि शुभम महेंद्र नारायणी असं या ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावं आहेत. हे दोघे ही 19 वर्षाचे आहेत. हे दोघेही मृत जितेंद्र जग्गी यांच्या परिचयाचे होते. या दोघांची चौकशी केल्यानंतर धक्कादायक सत्य बाहेर आले आहे. संज्योत दोडके आणि शुभम नारायणी यांना 31 डिसेंबरला  जितेंद्र यांनी पार्टीसाठी घरी बोलवले होते.  पार्टीत या तिघांनीही प्रचंड दारू घेतली.  त्यानंतर जितेंद्र याचा स्वत:वरचा कंट्रोल सुटला. त्यांनी या दोघानाही समलैगिंक संबध करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर त्या दोघांनाही या गोष्टीचा राग आला. 

ट्रेंडिंग बातमी - Chandu Chavan: 'माझे भारतीय नागरिकत्व रद्द करा' सैन्यात काम केलेला जवान असं का म्हणाला?

त्याच वेळी रागाच्या भरात शुभम नारायणी याने एक्सटेंशन बोर्ड जितेंद्र जग्गी यांच्या डोक्यात मारला. त्याचा प्रहार इतका मोठा होता की नशेत असलेल्या जितेंद्रचा जागेवरच मृत्यू झाला. त्याच वेळी घरात जितेंद्र यांची वृद्ध आई होती. संज्योत याने त्यांची आई गीता जग्गी यांचा गळा आवळला. दोघेही ठार झाले आहेत याची खातरजमा या दोघांनी केली. त्यानंतर त्यांच्या घरातील किमती सामान चोरून नेले. अशी कबुली चौकशी दरम्यान या दोघांनी दिली. समलैंगिक संबध ठेवण्यास जबरदस्ती केल्याने ही हत्या झाल्याचे उघड झाले आहे. 

Advertisement