मनोज सातवी, पालघर: दुकानात चोरी केल्याची तक्रार दिल्याच्या रागातून पुन्हा चोरी करत दुकान जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यात घडला आहे. आरोपीने दोन वेळा चोरी केली, एकदा दुकान पेटवण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पुन्हा आग लावली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून ही आपबिती सांगताना कुटुंबाला अश्रू अनावर झाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील खानिवली गावामध्ये एक भयानक घटना समोर आली आहे. एका दुकानात झालेल्या चोरीची तक्रार दिली म्हणून आरोपी उमेश सुरेश मुकणे यान सुरुवातीला किराणा दुकानदार महिलेच्या दुकानात येऊन तिचा विनयभंग केला नंतर रात्री येऊन पुन्हा चोरी केली आणि दुकान पेटवण्याचा प्रयत्न केला.
11 आरोपी, 6 हजार सीमकार्ड अन् 35 लॅपटॉप, रायगडमध्ये सायबर गुन्ह्याचा पर्दाफाश
मात्र बाजूच्या सजग नागरिकांनी दिलेल्या माहितीमुळे आग विझवली. परंतु हा महाभाग तिथेच न थांबता पीडित कुटुंब पुन्हा तक्रार द्यायला पोलीस ठाण्यात गेले असता त्याने पहाटेच्या सुमारास पुन्हा दुकानाला आग लावली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाला आहे. त्यामुळे आता जगायचं कसं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
ही घडलेली घटना सांगताना या कुटुंबाला अश्रू अनावर झाले. याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात आरोपी उमेश सुरेश मुकणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
गुंडाराज! गुंडांनी घरात घुसून AIIMS मधील नर्सच्या 2 मुलांना जिवंत जाळलं