जिम ट्रेनरबरोबर प्रेम, पतीची हत्या, एक वॉट्सअप मेसेज अन् 3 वर्षापूर्वीच्या खूनाचा उलगडा

तीन वर्षानंतर ऑस्ट्रेलियातून आलेल्या एका मेसेजने या केसचा चेहरा मोहराच बदलला आणि तब्बल तीन वर्षांनी या खूनाचे खरे सुत्रधार गजा आड झाले.

जाहिरात
Read Time: 3 mins
चंदीगड:

हरियाणाच्या पानिपतमध्ये तीन वर्षापू्र्वी झालेल्या खूनाच उलगडा करण्यात हरियाणा पोलिसांना यश आले आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल अशा पद्धतीनेच या खूनाचा उलगडा झाला आहे. रागातून केलेला एक खून असे समजून हे प्रकरण पोलिसांनी बंद केले होते. आरोपीलाही गडा केले होते. पण या खूना मागे ज्यांचा हात होते ते मात्र मोकाट होते. याची पुसटती कल्पनाही पोलिसांना नव्हती. मात्र तीन वर्षानंतर ऑस्ट्रेलियातून आलेल्या एका मेसेजने या केसचा चेहरा मोहराच बदलला आणि तब्बल तीन वर्षांनी या खूनाचे खरे सुत्रधार गजा आड झाले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विनोद भरारा यांची 15 डिसेंबर 2021 मध्ये त्यांच्या राहत्या घरी गोळी घालून हत्या करण्यात आली होती. ही हत्या देव सोनार यांने केली होती. या देवनेच या आधी विनोद यांना गाडी खाली चिरडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात विनोद जखमी झाले होते. पुढे आपण सेटलमेंट करायला तयार आहोत असे सांगत देव सोनार जेलमधून बाहेर आला. त्यानंतर तो थेट विनोद यांच्या घरी गेला तिथेच त्याने त्यांना गोळ्या घालून ठार केले. त्यामुळे रागातून देल सोनार याने खून केल्याचे पोलिसांना वाटले. पोलिसांनी तशी केस करून देव याला गजाआड केले. ही केस त्याच वेळी बंद झाली. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  मर्डर मिस्ट्री! आधी शॉक मग वार, 5 पुरावे अन् अभिनेता दर्शन अडकणार?

ही प्रकरण होवू तीन वर्षे उलटून गेली. केस बंद झाली होती. देव सोनार जेलमध्ये होता. पण अचानाक तीन वर्षानंतर पोलिस अधिकारी अजितसिंह शेखावत यांना एक वॉट्सअप मेसेज आला. हा मेसेज विनोद यांचा भाऊ प्रमोद याने ऑस्ट्रेलियातून केला होता. त्याने या मेसेजमध्ये विनोद याचा खून झाला आहे. यामागे कोणी तरी आणखी लोक गुंतलेले आहेत. याकडे पोलिसांनी लक्ष देवून तपास करावा असा तो मेसेज होता. पोलिसांनी हा मेसेज गांभिर्याने घेतला आणि या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी सुरू केली.  

Advertisement

चौकशी दरम्यान पोलिसांना एक गोष्ट निदर्शनास आली. ती म्हणजे विनोद भरारा यांची पत्नी निधी भरारा हीचे प्रेम प्रकरण.  निधी एका जीममध्ये जात होती. तिथे तिला सुमीत हा तरूण भेटला. या दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. जेव्हा पोलिसांनी या दोघांचे कॉल रेकॉर्ड तपासले तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. सुमीत हा विनोदच्या खून प्रकरणात जेलमध्ये होता. त्याच्या संपर्कात होता. पोलिसांचा संशय यामुळे बळावला. शिवाय सुमीत विनोदची पत्नी निधीच्याही सतत संपर्कात होता. त्यांच्यात नेहमी बोलणे होत होते. यावरून पोलिसांनी सापळा रचला आणि समीत याला अटक केली. 

Advertisement

चौकशी दरम्यान सुमीत आणि नीधी यांनी विनोद याचा खून करण्याचा कट रचला होता. त्यासाठी त्यांनी देव सोनारला सुपारी दिली होती. आधी अपघात करण्यात आला. त्यात विनोद बचावला. त्यानंतर देव याला जामीनावर सुमीतनेच बाहेर काढले. शिवाय खून केल्यास परिवाराला पैसे आणि कोर्ट केसमध्ये मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यातून देवने खून करण्याची तयारी दर्शवली आणि शेवटी विनोद याचा खून केला. देवच्या घरच्यांना निधी वेळोवेळी मोबदला देत होती. शिवाय तीने प्रत्यक्षदर्शी म्हणून नोंदवलेला जबाबही पुढे बदलला होता. या सर्व गोष्टी पोलिसांनी तपासून पाहील्या आणि या प्रकरणाचा उलगडा झाला.  हे कृत आपणच केल्याचे सुमीत याने पोलिस चौकशीत मान्य केले आहे. त्यानंतर नीधी हिलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. तिनेही आपला गुन्हा कबुल केला आहे.