सुरज कसबे, पिंपरी चिंचवड: अनेक महिलांची मॉर्फ केलेली नग्न छायाचित्रे ही त्यांच्या नातेवाईकांना पाठवून त्यांनी घेतलेल्या कर्जापेक्षा अधिकचे पैसे भरण्यासाठी ब्लॅकमेल केलं जात असल्याचे देखील समोर आले आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलिसांकडे 10 दिवसांत 100 हून अधिक अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.या तक्रारीच्या आधारावर सायबर पोलिसांनी गूगल शी पत्र व्यवहार करून प्ले स्टोअर वरून पाच अँप हटविले आहेत.
कशी होते फसवणूक?
पोलिस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तात्पुरत्या आर्थिक गरजेसाठी प्ले स्टोअर वरील या लोन अँप वरून कर्ज घेतलं जाते. हे कर्ज ही हे अँप तात्काळ तुमच्या बँक खात्यावर टाकलं जाते.. ही लोन अँप कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईल ची वैयक्तिक माहिती, कॅमेरा, संपर्क , लोकेशन, गॅलरी ची परवानगी मागतात. कर्जाची रक्कम भरल्यानंतरही किंवा वेळेत न भरल्यामुळेही वापरकर्त्यांना धमकावणे, ब्लॅकमेल करणे, महिलांचे मॉर्फ केलेली नग्न छायाचित्रे त्यांच्या नातेवाईकांना पाठवणे आणि ज्यादा पैशाची मागणी करणे असे प्रकारे या अँपद्वारे केले जातात, काहींनी विहित मुदतीत कर्जाची रक्कम भरूनही ब्लॅकमेल केलं जात, असल्याचे पुढ आले आहे .
गुगल वरून हटविली ही पाच अँप
1 Credit lens
2 Racpmta
3 RPMTA
4 Credit pilot
5 Reba cash
प्रस्तावीत कारवाईची अँप
1 Kee Credit: Financial Assistance
2 SC Elite VIP
3 Luma in max
4 Exconversion
अशी रोखावी फसवणूक (What to do to avoid online loan fraud)
- रिझर्व्ह बँकेने किंवा सेबीची मान्यता असलेली अँप वापरावीत .
- आर्थिक अँप बाबत पूर्ण माहिती घेऊनच ते डाऊनलोड करा.
- अनोळखी अँपला पॅन कार्ड, आधार कार्ड ची माहिती, आपले फोटो, मोबाईल नंबर शेअर करू नका.
- संशयास्पद अँप वापरणे टाळा .
- फसवणूक झाल्यास तात्काळ https://cybercrime.gov.in वर तक्रार करा.