Pooja Jatav Murder Case: हसतमुख आणि सुंदर-सोज्जवळ दिसणारी एक स्त्री इतकी क्रूर आणि खुनी असू शकते, याची कुणी कल्पनाही करू शकत नाही. पूजा जाटव असं या महिलेचं नाव आहे. पूजानं जे काही केले आहे, ते पाहून आणि ऐकून सगळेच थक्क झाले आहेत. या प्रकरणातील आरोपानुसार पूजानं आधी तिच्या पहिल्या पतीवर हल्ला करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. तो वाचला, पण पूजाला कारावास भोगावा लागला.
कोर्टाच्या फेऱ्या मारता-मारता तिला एक दुसरा व्यक्ती भेटला, ज्याच्यासोबत ती लिव्ह-इन मध्ये राहिली. नंतर त्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. तिसऱ्या व्यक्तीसोबत ती जोडली गेली. त्यानंतर तिच्या सासूचा खून केल्या आरोप पूजावर करण्यात आला आहे. आता या प्रकरणात पूजा तिची बहीण आणि प्रियकराला फाशी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातल्या झाशीमधील हे प्रकरण आहे. आरोपी पूजा पूजा जाटववर तिच्या बहिणीसोबत आणि तिच्या प्रियकरासोबत मिळून सासूच्या खुनाचा आरोप आहे. पूजाचे पहिले लग्न झाशी येथील एका रेल्वे कर्मचाऱ्यासोबत झाले होते. असे सांगितले जाते की, पूजाच्या चारित्र्यामुळे तो तिच्यावर नाराज होता. त्यामुळे संतापलेल्या पूजाने पतीवर जीवघेणा हल्ला केला. त्यामुळे पूजा तुरुंगात गेली.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पूजा खटल्याच्या संदर्भात न्यायालयात जाऊ लागली, तेव्हा तिची ओळख कल्याण राजपूत या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीशी झाली. दोघांची मैत्री झाली. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. ते दोघे एकत्र राहू लागले. एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच कल्याणचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.
( नक्की वाचा : Pune News : 'तो कुरियवाला नाही तर बॉयफ्रेंड' त्या दिवशी बिनसलं म्हणून... कोंढवा प्रकरणात जबरदस्त ट्विस्ट )
दीर-सासऱ्यासोबत जुळले प्रेम!
यानंतर कल्याणचे वडील अजय राजपूत यांना पूजाची दया आली. त्यांनी तिला घरी आणले आणि तिला आश्रय दिला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पूजाचे या दरम्यान मृत पती कल्याणचा विवाहित मोठा भाऊ संतोष राजपूत याच्यासोबत संबंध जुळले. त्यांना एक मुलगीही झाली. मुलगी झाल्यानंतर संतोषची पत्नी रागिणीनेही हे नाते नाईलाजानं स्वीकारले. इतकेच नाही, तर सासरा अजयसोबतही पूजाचे संबंध होते असे आरोप आहेत.
सासूचा घेतला जीव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष राजपूतता पुजाकडे वाढत असलेला कल त्याची पत्नी रागिणीला खटकू लागला. दुसरीकडे, पूजालाही पती कल्याणच्या वाट्याला आलेली आठ एकर जमीन विकून ग्वाल्हेरला स्थलांतरित व्हायचे होते. याच गोष्टींवरून वाद झाले तेव्हा रागिणी तिच्या माहेरी निघून गेली. पूजाही ग्वाल्हेरला गेली. सासू सुशीला ही जमीन विकण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा होती. तिला जमीन विकायची नव्हती. यानंतर पूजाने कथितपणे नवे षडयंत्र रचले.
( नक्की वाचा : Mumbai School : गोळ्या दिल्या, दारू पाजली; मुंबईतील बड्या शाळेच्या वासनांध शिक्षिकेचे भयंकर कृत्य )
बहीण आणि तिचा प्रियकर बनले खुनी
ग्वाल्हेरमध्येच पूजाचे तिची बहीण कमला उर्फ कामिनी हिच्याशी बोलणे झाले. कामिनी आर्थिक संकटात होती. कामिनीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि जमीन विकण्याच्या मार्गातील अडथळा असलेल्या सासू सुशीलाला दूर करण्यासाठी पूजाने कथित षडयंत्र रचले. पूजाने 22 जून रोजी मुलीच्या वाढदिवसासाठी सासरा अजय आणि दीड संतोषला घरी बोलावले.
दोघे एक दिवस तिथेच थांबले.
आधी झोपेची गोळी दिली....
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , 23 जूनच्या रात्री सासरा आणि पती ग्वाल्हेरमध्ये आरामात झोपले होते, आणि नियोजनानुसार 24 जून रोजी सकाळी सुमारे साडेपाच वाजता कामिनी तिच्या प्रियकर अनिल वर्मासोबत बाइकने गावात पोहोचली. त्यावेळी सुशीला त्यांच्या वाड्यामध्ये काम करत होती. तिला घरी बोलावण्यात आले. यानंतर सर्वांनी चहा घेतला. याच दरम्यान कामिनीने तिचा प्रियकर अनिलसोबत मिळून सुशीलाला झोपेचा मोठा डोस दिला. सुशीला बेशुद्ध झाली.
यानंतर दोघांनी सुशीलाचे हात-पाय बांधून आणि तोंडात कापड खुपसून मारहाण केली आणि तिची हत्या केली. इतकेच नाही, तर दोघांनी सुशीलाच्या खोलीत ठेवलेले सुमारे 8 लाख किमतीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा हे प्रकरण सासू, सून आणि षडयंत्र या सर्व गोष्टी समजल्या.पोलिसांनी सून पूजा जाटव, तिची बहीण कामिनी आणि तिचा प्रियकर अनिल वर्मा यांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे.