इंजिनीअर तरुणीचा कारनामा; घरातून चालवत होती गर्भलिंग निदान केंद्र, महापालिकेची कारवाई

उच्चभ्रू वस्तीत गर्भनिदान केंद्र चालवलं जात असल्याची माहिती आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा यांना मिळाली होती.

जाहिरात
Read Time: 1 min

छत्रपती संभाजीनगरमध्ये गर्भलिंग निदान करणारे रॅकेट समोर आलं आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने ही मोठी कारवाई केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे इंजिनीअर तरुणी हे गर्भलिंग निदान केंद्र चालवत होती. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एका उच्चभ्रू वस्तीत गर्भलिंग निदान केंद्र चालवलं जात असल्याची माहिती आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा यांना मिळाली होती. त्यानुसार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर छापा मारला. यावेळी एका खोलीत गर्भलिंग निदान करण्यात येत असल्याचं पथकाच्या निरदर्शनास आले.  

(नक्की वाचा- हत्येपूर्वी डॉक्टरांना केलं टॉर्चर, पाळीव कुत्रा घेणार मारेकऱ्यांचा शोध? )

आरोग्य विभागाच्या पथकाने अधिक चौकशी केली असता इंजिनीअरिंग करणारी एका तरुणीकडून हे गर्भनिदान केंद्र चालवले जात असल्याचे समोर आले. तरुणी भाड्याच्या घरात कुटुंबासोबत राहत होती. तिथे ती हे गर्भनिदान केंद्र चालवत होती. यावेळी आरोग्य पथकाला घटनास्थळी 12 लाख 78 हजारांची कॅश देखील मिळून आली. 

(नक्की वाचा - 'हे गझनी सरकार, त्यांच्या प्रचारात पाकिस्तान, आमच्या प्रचारात हिंदुस्थान')

यावेळी या तरुणीच्या खोलीत सोनोग्राफीसाठी लागणारे साहित्य, लॅपटॉप, टॅब देखील मिळून आले. सर्व साहित्य जप्त करण्यात आलं आहे. एका उच्चभ्रू वस्तीत एक इंजिनीअरिंग करणारी तरुणी गर्भलिंग निदान केंद्र चालवत असल्याचं समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

Topics mentioned in this article