Psycho Killer Poonam: हरियाणातील (Haryana) पानिपतमधील (Panipat) एका महिलेनं 'माझ्यापेक्षा दुसरी कोणतीही मुलगी जास्त सुंदर असू नये' या अट्टहासापोटी चार निष्पाप मुलांची हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरून गेले आहे. पानिपतच्या भावड (Bhawad) गावातील पूनमने तीन लहान मुलींसह स्वतःच्या मुलाचीही हत्या केली होती. या प्रकरणातील एका अत्यंत वेदनादायक माहितीचा उलगडा तिच्या कुटुंबाने केला आहे.
पूनमने ज्या मुलाची हत्या केली होती, त्याचे नाव शुभम होते. कुटुंबीयांनी सांगितले की, पूनम तिच्या पहिल्या मुलावर खूप प्रेम करायची आणि तो गेल्यानंतर त्याची तिला वारंवार आठवण येत असे. याच कारणामुळे जेव्हा तिला दुसरा मुलगा झाला, तेव्हा त्याचे नावही तिने शुभम असेच ठेवले. स्वतःच्या पहिल्या मुलाची हत्या तिने केवळ आपल्यावर संशय येऊ नये म्हणून केली होती, असे सांगितले जात आहे.
पूनमने 2017 साली दुसऱ्या एका अल्पवयीन मुलावर चाकूने हल्ला करून त्याला जखमी केले होते. त्यामुळे या क्रूरतेची सुरुवात खूप पूर्वी झाली होती.
( नक्की वाचा : Psycho Killer : भयंकर! फक्त सौंदर्याच्या हव्यासातून महिलेने संपवली 4 मुले! पोटच्या मुलाचीही हत्या )
2021 पासून हत्येचे प्रयत्न
पूनमने मुलांना लक्ष्य करण्याची सुरुवात सन 2021 मध्ये केली. त्यावेळी तिने 'विधी' नावाच्या एका लहान मुलीच्या चेहऱ्यावर उकळलेला चहा ओतला होता. चहाच्या मोठ्या किटलीमुळे विधि गंभीररित्या भाजली, पण ती वाचली. विधिच्या वडिलांनी त्यावेळी हा अपघात मानून हे प्रकरण दाबले होते.
2025 मध्ये तिने पुन्हा एकदा विधीला लक्ष्य केले. यावेळी तिने तिला पाण्याने भरलेल्या टबमध्ये बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, हीच तिची चूक ठरली. सहा वर्षांची लहान मुलगी स्वतःहून टबमध्ये बुडून मरणार नाही, असा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यावेळी, त्यांना आढळले की ज्या खोलीत विधिचा मृतदेह होता, त्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता. यावरून हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाले. भविष्यात आपल्यापेक्षा कोणतीही मुलगी सुंदर दिसू नये, याच विकृत विचारातून तिने या निष्पाप मुलींची हत्या केल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
( नक्की वाचा : Akola News: 2 दिवसांत CEO दाखल! आमदार मिटकरींचा दौरा अकोल्याच्या डॉक्टरांसाठी ठरला कर्दनकाळ; कुणावर कारवाई ? )
पूनमने कधी, कुणाची हत्या केली?
2023 मध्ये इशिकाची हत्या (9 वर्षे)
2023 मध्ये स्वतःच्या मुलाची, शुभमची हत्या (4 वर्षे)
सन 2025 मध्ये जियाची हत्या (8 वर्षे)
सन 2025 मध्ये विधीची हत्या (6 वर्षे)