Symbiosis College सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये प्रवेश हवाय! 5 लाख रुपये द्या, पुण्यात सुरु होतं भयंकर रॅकेट

Symbiosis College, Pune : पुण्याच्या प्रसिद्ध सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये प्रवेशासाठी 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
Symbiosis College Admission : या आरोपींचे पुण्यात भव्य ऑफिस देखील होते. त्यामध्ये प्रवेशासाठी जाण्याची सूचना देण्यात आली होती.
पुणे:

रेवती हिंगवे, प्रतिनिधी

'ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट' 'विद्येचं माहेरघर' या नावानं पुणे शहर जगभर प्रसिद्ध आहे. पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याची जगभरातील विद्यार्थ्यांची इच्छा असते. त्यासाठी दरवर्षीच मोठी स्पर्धा असते. वाढती मागणी आणि मर्यादित जागा यामुळे ही स्पर्धा दिवसोंदिवस तीव्र होत आहे. त्यामधूनच विद्यार्थी आणि पालकांच्या असह्यतेचा फायदा घेण्याचे प्रकार घडत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पुण्याच्या प्रसिद्ध सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये (Symbiosis College, Pune ) प्रवेशासाठी खोटी जाहिरात देण्यात आल्याचं उघड झालं आहे. सोशल मीडियावर कॉलेजची खोटी जाहिरात तयार करुन तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होता. या प्रकरणात महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली आहे.

या तक्रारीनंतर तीन जणांवर डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश यादव, कुणाल कुमार आणि दिव्या या तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींचे पुण्यात भव्य ऑफिस देखील होते.

( नक्की वाचा : Pune News : जमीन कराराचं उल्लंघन ते कर्मचाऱ्यांचा छळ, मंगेशकर हॉस्पिटलचा 'हा' इतिहास माहिती आहे? )

कसा झाला प्रकार उघड?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार महाविद्यालयाच्या व्यवस्थापनातील एक जण YouTube पाहात होता. त्यावेळी त्यांना एका यूट्यूब चॅनेलवर सिम्बॉयसिस  संस्थेचा लोगो असलेल्या इमारतीचा फोटो दिसला. त्यावर महाविद्यालयात एमबीए डमिशनसाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश हवा असल्यास ज्यांचे बजेट आहे, त्यांनी दिलेल्या क्रमांकावर साधावा, अशी खोटी जाहिरात देण्यात आली होती. त्यांनी तात्काळ ही बाब महाविद्यालयाच्या वरिष्ठांना सांगितली त्यानंतर डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. 

संस्थेनं हे प्रकरण जाणून घेण्यासाठी त्या जाहिरातीवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी एका आरोपीने त्यांना नोयडा मध्ये असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर अ‍ॅडमिशनसाठी तुम्ही पुण्यातील बाणेर भागात असलेल्या ऑफिसमध्ये जाण्याची सुचना केली. त्या ऑफिसमध्ये गेल्यावर दुसऱ्या आरोपीने सुरुवातीला 5 लाख रुपये आणि मूळ कागदपत्रे देण्याची मागणी केली. त्याचबरोबर आम्ही तुमचे नाव मेरिट लिस्टमध्ये टाकून तुम्ही उशीर केल्यास डोनेशनचे पैसे वाढत जातील अशी भीती देखील घातली होती.

Advertisement

या आरोपींच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 319, 336 (3), 340(1), 340(2), 61, 62, 66 (ड) या अन्वये गुन्हा दाखल असून संबंधित प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे