सुरज कसबे, पुणे: राज्यात अत्याचार, महिला विनयभंगाच्या घटना काही थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच आता लोणावळ्यामधून एक संतापजनक प्रकार घडला आहे. पर्यटन नगरी लोणावळ्यातील एका स्थानिक तरुणीवर कारमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 23 वर्षीय तरुणीवर 25 ते 35 वयोगटातील तिघांनी या पीडित तरुणीला लोणावळयातील तुंगार्ली परिसरातून ती पायी जात असताना जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिच्यावर गाडी थांबवत वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करण्यात आलेत. यानंतर आरोपीने तिला सामसूम असलेल्या रस्त्याच्या कडेला टाकून दिलं आहे.
Bihar Crime: संतापजनक! होमगार्ड भरतीवेळी तरुणी बेशुद्ध पडली, रुग्णालयात नेताना नराधमांनी लचके तोडले
या घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस घटनेचा तपास करत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून, तरुणीवर अत्याचार करणाऱ्या एका आरोपीला 12 तासांत अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर दोन आरोपी फरार असून या नराधमांचा शोध सध्या पोलीस घेत आहे. मात्र या संतापजनक घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
Buldhana : गाय चोरल्याचा संशय, धर्म विचारुन तरुणाला झाली मारहाण! महाराष्ट्रातील खळबळजनक घटना