Pune Crime: लॉजवर प्रेयसीचे बर्थडे सेलिब्रेशन, नंतर त्याच चाकूने गळा कापला, पुण्यात रक्तरंजित थरार!

Pune Crime: आरोपी दिलावर सिंग याने तिचा वाढदिवस साजरा केला. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने मेरीची हत्या केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

सूरज कसबे, पिंपरी चिंचवड 

 Pune Crime Boyfriend Killed Girlfriend: प्रेमसंबंधातून संशयाच्या जाळ्यात अडकलेल्या एका प्रियकराने वाढदिवस साजरा केल्यानंतर अवघ्या काही तासांतच आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमधील वाकड येथील एका लॉजवर शनिवारच्या दुपारी उघडकीस आली आहे. 

प्रेयसी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्याचा संशय आल्याने प्रियकराने तिची चाकू आणि ब्लेडने वार करून हत्या केली. मेरी तेलगू असे 26 वर्षीय मृत प्रेयसीचे  नाव आहे तर दिलावर सिंग  असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

Bira 91 : फक्त एक शब्द काढला आणि बिअर ब्रँड अडचणीत; 748 कोटींचं नुकसान... वाचा काय घडलं?

नेमकं काय घडलं?| Why Boyfriend Killed Girlfriend

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑक्टोबरला प्रेयसी मेरी तेलगू हिचा वाढदिवस होता. मेरीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करायला दोघेही  वाकड येथील एका लॉजवर गेले होते, त्यावेळी ही हृदयद्रावक घटना घडली. आरोपी दिलावर सिंग याने तिचा वाढदिवस साजरा केला. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने मेरीची हत्या केली.

मेरी ही डी-मार्टमध्ये काम करत होती, तर दिलावर हा हॉटेल व्यावसायिक आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर त्यांची मैत्री झाली, ज्याचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दिलावरला मेरीवर संशय होता. मेरी त्रयस्थ व्यक्तीच्या प्रेमात पडली असल्याचा संशय त्याला होता, याच संशयातून त्याने हे भयंकर कृत्य केले.

Advertisement

Shocking Murder: पत्नीने पतीचा केलेला खून पचला होता, पण हाडाचा सांगाड्याने खेळ बिघडवला

आधी सेलिब्रेशन मग रक्ताचा रडा

मेरीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी लॉजवर त्याने चाकू आणि ब्लेडने तिच्यावर वार करत तिची हत्या केली. ह्या हत्येनंतर आरोपी दिलावर सिंग याने थेट कोंढवा पोलीस स्टेशन गाठले आणि तेथे आत्मसमर्पण केले. त्यानंतर ही संपूर्ण धक्कादायक घटना समोर आली. वाकड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.