एक सुनियोजित टूर, बरोबर भरपूर सोन्याचे दागिने, संशयास्पद व्यवहार आणि नात्यांच्या आडून पाठीत वार करण्याचा कट. या सगळ्याने मिळेच राजा रघुवंशीच्या हत्येचं प्रकरण देशभर चर्चीलं जात आहे. सोनमने बुक केलेल्या टूरने याची सुरुवात झाली. याबाबत दोघांच्याही कुटुंबाला फारशी माहिती दिली गेली नाही. हनिमूनवर जाताना सोनमनं बरोबर 10 लाखांपेक्षा जास्त किंमतीचं सोनं बरोबर घेतलं होतं. हे एक रहस्य होत. पण आता तपासासाठी हाच एक मोठा क्लू बनला आहे. लग्नादरम्यान मोठे बँक व्यवहार झाले. शिवाय सोनमचा प्रेमी राज कुशवाहाशी ती जास्त वेळ बोलत ही होती. त्यामुळे संशयाची सुई सोनमच्या दिशेने वळली आहे. मेघालय आणि इंदूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अनेक संशयितांना अटक करण्यात आली आहे.तर सोनम ही पोलिसांच्या ताब्यात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुरुवात एका टूरने झाली
सोनमनेच या टूरची पूर्ण तयारी केली होती. फ्लाइट तिकिटापासून ते हॉटेल बुकिंगपर्यंत सर्व व्यवस्था तिनेच केल्या होत्या. विशेष म्हणजे, सोनमच्या कुटुंबाला या टूरची फारशी माहिती दिली गेली नव्हती. लग्नानंतर सोनम थेट विमानतळावर पोहोचली होती.
सोन्याचं रहस्य
हनिमूनवर मोठ्या प्रमाणात सोनं सोनम आणि राजा घेऊन निघाले होते. तेच या हत्येच्या कटातलं मोठा क्लू बनलं आहे. राजाच्या आईनेही प्रश्न विचारला होता की, 'अखेर हनिमूनवर कोण एवढं सोनं घालून जातं?' एकट्या राजाकडेच 10 लाखांपेक्षा जास्त किमतीचं सोनं होतं. यात डायमंड रिंग, गळ्यातील चेन, ब्रेसलेटसह अनेक दागिने होते.
शिलाँगला जाणं आधीच ठरलं होतं
सोनमचे कुटुंबीय आधीच शिलाँगला जाऊन आले होते. सोनमच्या आईने ही माहिती राजाच्या आईलाही दिली होती. त्यामुळे आता असं समजत आहे की हा आधीच तयार केलेल्या कटाचा भाग होता. कारण सोनमली तिथली सर्व माहिती होती.
संशयास्पद व्यवहारांची कहाणी
लग्नादरम्यानच सोनमने राजासोबत मोठे बँक व्यवहार केले होते. हे व्यवहार आता पोलिसांसाठी तपासाचा एक मोठा आधार बनले आहेत.
राज कुशवाहाशी सोनम होती संपर्कात
इंदूर क्राईम ब्रांचने सोनम आणि राजची कॉल डिटेल्स तपासली. यात समोर आलं की, सोनम राज कुशवाहाशी सतत दीर्घकाळ फोनवर बोलत होती. इथूनच संशयाची सुई सोनमवर येऊन थांबली.
पोलिसांची संयुक्त कारवाई
मेघालय पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गाईडच्या माध्यमातून संशयितांची ओळख पटवली आहे. यात मध्य प्रदेशातील 3-4 लोकांची नावे समोर आली. ही माहिती इंदूर पोलिसांना देण्यात आली आहे. त्यानंतर अटकेची प्रक्रिया सुरू झाली.
कुटुंबच अखेरचा आधार
हत्येला अपघाताचं स्वरूप देण्याचा प्रयत्न फसला. त्यामुळे कट करणारे ही घाबरले होते. सोनमच्याही कुणी संपर्कात नव्हते. शेवटी तिनेच आपल्या कुटुंबाला संपर्क केला.