Ramee Group of Hotels : मुंबई-पुण्यासह देशात आणि परदेशातील प्रसिद्ध रामी हॉटेलांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर हॉटेल वर्तुळात खळबळ उडाली आहे. २ डिसेंबर २०२५ रोजी दिवसभर आयकर विभागाकडून ३८ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. छाप्याच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
छापेमारीचं कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या आर्थिक व्यवहारात घोटाळा असल्याच्या संशयावरुन आयकर विभागाकडून चौकशी केली जात आहे. आयकर विभागाकडून या छापेमारीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जारी केलेली नाही. रामी समूहाचे देशात आणि परदेशात ५२ हॉटेल्स आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूडकरांची पसंतीची जागा बॉम्बे अड्डा हे हॉटेलदेखील याच समूहाचं आहे.
नक्की वाचा - IIT Placement : IIT प्लेसमेंटमधून 20 कंपन्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; विद्यार्थ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय
दादरमधील हॉटेलवरही छापेमारी...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाच्या टीमने सांताक्रूझमधील रामी ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या मुख्यालयावर, दादर पूर्वेतील हॉटेलवर आणि ग्रुपच्या मालकाच्या निवासस्थानी छापे टाकले आहेत. करचुकवेगिरीच्या संदर्भात ही कारवाई केली जात आहे. मुंबईसह देशभरातील १० शहरांमध्ये एकूण ३८ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. याशिवाय, वरदराज मंजप्पा शेट्टीशी संबंधित ठिकाणांवरही छापे टाकण्यात येत आहेत.