Ratnagiri Crime : रत्नागिरी शहर पोलिसांनी प्रेयसी भक्ती मयेकर (16 ऑगस्ट) खूनप्रकरणात अटक केलेल्या दुर्वास पाटील याने आणखी दोन खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलं (Crime News) आहे. एका खुनाचा तपास करीत असताना आणखी दोन खून उघड झाले आहे. या तिन्ही खुनामागे परस्पर संबंध असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. दुर्वासने पहिला खून सीताराम वीर (50, वाटद-खंडाळा), दुसरा खून राकेश जंगम (28, वाटद,खंडाळा), तर तिसरा खून भक्ती मयेकर हिचा खून केल्याचं चौकशीत निष्पन्न झाले आहे.
काय आहे प्रकरण?
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे गावातून गेल्या दोन आठवड्यांपासून भक्ती जितेंद्र मयेकर ही तरुणी बेपत्ता झाली होती. आंबा घाटात निर्जन ठिकाणी या तरुणीचा मृतदेह फेकण्यात आला होता. भक्ती मयेकर हिची तिचा प्रियकर दुर्वास पाटील यानेच हत्या केली होती. भक्ती लग्नाचा सतत तगादा लावते, यावरुन त्याने थेट भक्तीचा जीवच घेतला होता.
नक्की वाचा - Nashik Crime : डुक्करांना त्रास म्हणून कुत्रे-मांजरींना विष देऊन संपवलं; संतापजनक कृत्य
आणखी दोघांची हत्या
भक्तीची हत्या करण्यापूर्वी दुर्वासने आणखी दोघांचा खून केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताराम वीर (50, वाटद-खंडाळा) हा भक्तीला फोन करुन त्रास देत होतो. फोन करून तो तिच्याशी अश्लिल बोलत होता. यावर आपल्या प्रेयसीला त्रास देत असल्याचं दुर्वासला कळल्यानंतर त्याने सीतारामला हॉटेलला बोलावलं. आणि तिथं सीतारामला मारहाण केली. त्याला इतकं मारलं की यात त्याचा मृत्यू झाला. सीतारामला मारलं यावेळी त्याचा मित्र राकेश जंगम (28, वाटद,खंडाळा) हादेखील तिथं उपस्थित होता. राकेश आणखी कोणाला सांगेल या भीतीने त्याने राकेशची हत्या केली.
पोलीस चौकशीत दुर्वास याने सीताराम वीर याला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची कबुली दिली. तसेच वीर याच्या खुनाची माहिती राकेश जंगम याला होती. ती तो पोलिसांना देईल, अशी भीती वाटत असल्याने त्यालाही बारमध्ये ठार मारून त्याचा मृतदेह आंबा घाटात दरीत टाकल्याचे दुर्वास याने कबूल केले.