Shocking news: श्रीकृष्णाचा फोटो अरबी 'चिकन' डिश सोबत, वादग्रस्त पोस्टर समोर, अशरद कनेक्शन काय?

परिसरात शांतता राखण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • केरळ विशू सणाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्ण यांचा चिकन मंडीसोबतवादग्रस्त पोस्टर
  • पोलीसांनी गुन्हा दाखल करून रेस्टॉरंट मालक अरशद याला केली अटक
  • थन्नीमुक्कम येथील वकील एम.व्ही. बीजू यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यात एका वादग्रस्त जाहिरातीमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 'विशू' या सणाच्या निमित्ताने शुभेच्छा देणाऱ्या एका पोस्ट कार्डमध्ये भगवान श्रीकृष्ण यांना 'चिकन मंडी' या अरबी मांसाहारी पदार्थासोबत दाखवण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 'मेहर मंडी अँड ग्रिल्स' या रेस्टॉरंटचा मालक अरशद याला ताब्यात घेतले आहे.

थन्नीमुक्कम येथील वकील एम.व्ही. बीजू यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. ज्या देवतेची पूजा शाकाहार आणि पवित्रतेचे प्रतीक म्हणून केली जाते, त्यांना मांसाहारासोबत दाखवणे हा कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 153 आणि 295 अ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, जातीय सलोखा बिघडवल्याचा ठपका ठेवला आहे. दरम्यान, रेस्टॉरंटच्या भागीदाराने इन्स्टाग्रामवर माफीनामा प्रसिद्ध केला असला तरी हिंदू संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

Advertisement

नक्की वाचा - महिला आरक्षण- डिलिमिटेशन घटना दुरूस्ती विधेयक नामंजूर, लोकसभेत कुणाच्या बाजूने किती मतं?

ही घटना 'विशू' सणाच्या काळात घडली. सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. वकील एम.व्ही. बीजू यांनी पोलिसात धाव घेत एफआयआर नोंदवला. "आपल्या आराध्य दैवताचा असा अपमान सहन केला जाणार नाही," अशी भावना भाविकांनी व्यक्त केली आहे. वादाचे स्वरूप पाहता हॉटेलचे पार्टनर शमीर यांनी "ही एक तांत्रिक चूक होती," असे सांगत माफी मागितली आहे, परंतु तरीही परिसरातील तणाव कायम आहे.

नक्की वाचा - Rahul Gandhi: 'हे महिला आरक्षण बिल नव्हे, तर..' राहुल गांधी लोकसभेत हे काय बोलले, एकच गोंधळ

केरळमध्ये एका हॉटेल मालकाने प्रसिद्ध केलेल्या वादग्रस्त पोस्टरमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. अरबी डिश 'चिकन मंडी' विकण्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या चित्राचा वापर करण्यात आल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. अलाप्पुझा जिल्ह्यातील चेर्थला पोलिसांनी या प्रकरणी हॉटेल मालक अरशदला अटक केली आहे. या घटनेचे पडसाद सोशल मीडियावर उमटल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. या गुन्ह्यासाठी 1 वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे. आरोपीने हा फोटो जाणीवपूर्वक पोस्ट केला नसल्याचा दावा केला असला, तरी विश्व हिंदू परिषदेने या कृत्याचा निषेध करत रेस्टॉरंटबाहेर निदर्शने केली आहेत. परिसरात शांतता राखण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.