Acid Attack: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आला अन् मुलीवर ॲसिड फेकले; पाहा कसा दिसतो संगमनेरचा नराधम

Sangamner Acid Attack: तपासाला गती देण्यासाठी पोलिसांनी संशयित आरोपीचे रेखाचित्र जाहीर केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Sangamner Acid Attack: आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे.
संगमनेर:

सुनील दवंगे, प्रतिनिधी

Sangamner Acid Attack: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका सध्या एका अमानुष घटनेने हादरून गेला आहे. वडगाव पान परिसरात एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याला आता 60 तास उलटून गेले आहेत. मात्र, एवढा वेळ उलटूनही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. 

या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अखेर तपासाला गती देण्यासाठी पोलिसांनी संशयित आरोपीचे रेखाचित्र जाहीर केले असून नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे.

Advertisement

नेमकी घटना काय?

ही धक्कादायक घटना मंगळवार 17 मार्च रोजी घडली. शाळा सुटल्यानंतर ही अल्पवयीन मुलगी आपल्या घराकडे परतत होती. हाडकीचा ओढा परिसरातील कच्च्या रस्त्यावर एका अज्ञात व्यक्तीनं तिला अडवले. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याने संवाद साधला आणि अचानक आपल्या जवळील बाटलीतील ॲसिडसदृश द्रव मुलीच्या चेहऱ्यावर फेकून तिथून पळ काढला. या अनपेक्षित आणि भीषण हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे.

( नक्की वाचा : Shirdi News: कॅप्टन खरात प्रकरणात विखे पाटलांचा खळबळजनक खुलासा, अहिल्यानगर जिल्ह्यात अनेकांना फुटला घाम! )

पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या या मुलीला तातडीने लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या चेहऱ्यावर प्राथमिक शस्त्रक्रिया करण्यात आली असून, सध्या डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 124 (1) आणि 126 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

10 विशेष पथके तरीही आरोपी मोकाट

गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. गुन्हे शोध पथक, फॉरेन्सिक युनिट, शहर पोलीस आणि तालुका पोलीस यांची मिळून एकूण 10 विशेष पथके आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र, घटनेला दोन दिवसांहून अधिक काळ उलटूनही पोलिसांना ठोस धागादोरा मिळालेला नाही. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप अधिकच वाढत आहे.

संशयिताचे रेखाचित्र जाहीर आणि पोलिसांचे आवाहन

तपासात प्रगती व्हावी यासाठी पोलिसांनी पीडित मुलगी आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने संशयित आरोपीचे रेखाचित्र (Sketch) तयार केले आहे. हे रेखाचित्र आता सार्वजनिक करण्यात आले असून, यातील व्यक्तीबाबत काहीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे.

Advertisement

महत्त्वाचे संपर्क क्रमांक:

जर तुम्हाला रेखाचित्रातील व्यक्तीबाबत काहीही माहिती असेल, तर खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
9689903588 / 02425-225433 / 9822300233 / 9527930997

समाज म्हणून आपली जबाबदारी ओळखून अशा नराधमाला पकडून देण्यासाठी नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे.
 

Topics mentioned in this article