संतोष देशमुख हत्येआधी हॉटेलमध्ये काय घडलं? धक्कादायक सीसीटीव्ही आला समोर

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता एकएक गोष्टींचा उलगडा होत आहे. त्यांच्या हत्ये आधीचे एक सीसीटीव्ही फुटेज सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
बीड:

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यभरात खळबळ उडाली आहे. गल्लीपासून ते अगदी दिल्लीपर्यंत या प्रकरणाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. मात्र या हत्या प्रकरणात आता आणखी एक वेगळे वळण लागले आहे. या हत्ये आधीचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि पीएसआय राजेश पाटील हे दिसत आहे. त्यानंतर तिथे ज्यांची हत्या झाली त्या संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हे पण येताना दिसत आहेत. याबाबत आता धनंजय देशमुख यांनीही मोठा खुलासा केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता एकएक गोष्टींचा उलगडा होत आहे. त्यांच्या हत्ये आधीचे एक सीसीटीव्ही फुटेज सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हत्ये आधी पीएसआय राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन घुले यांचा केज शहरातील बसंत बिहार या उडपी हॉटेलमध्ये भेटले होते. त्याचा व्हिडीओ याआधीच समोर आला होता. आता दुसरा सीसीटीव्ही व्हिडिओ ही समोर आला आहे. ज्यामध्ये पीएसआय राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले एकत्र दिसत आहे. त्यांच्यात काही तरी चर्चा होतानाही दिसत आहे. त्याच वेळी ज्यांची हत्या झाली त्या संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख त्या हॉटेलमध्ये पोहोचतो. त्यानंतर दोघांसोबत त्याचीही चर्चा होताना या सीसीटीव्हीत दिसत आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - संतोष देशमुख हत्या! आरोपी बरोबर काय संबंध? धनंजय मुंडे पहिल्यांदाच थेट बोलले

हॉटेलमध्ये आरोपी घुले व  पीएसआय राजेश पाटील यांची भेट होते. त्यांच्या चर्चा होत असल्याचंही दिसून येत आहे. काही वेळातच धनंजय देशमुख हे त्या ठिकाणी येतात. याबाबत धनंजय देशमुख यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मी त्या हॉटेलमध्ये मित्रांसोबत चहा प्यायला गेलो होतो. त्यावेळी राजेश पाटील व घुले हे त्या ठिकाणी बसले होते. यातील राजेश पाटील यांनी धनंजय देशमुख यांना बोलावून घेतले. शिवाय  यापूर्वी झालेल्या मारामारीबाबत माहिती घेतली. त्यांना ती माहिती दिली. एवढेच आमचे बोलणे झाले असे धनंजय देशमुख यांनी सांगितले आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - एकनाथ शिंदेंना नाराज आमदार दणका देणार? ठाकरेंच्या वक्तव्याने नागपूरचं वातावरण तापलं

त्या व्हिडीओत आपणच असल्याचे धनंजय देशमुख यांनी मान्य केले आहे. शिवाय आपल्या बरोबर गावातले मित्र होते असंही त्यांनी सांगितलं आहे. ज्या दिवशी खू झाला त्याच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडीओ असल्याचेही त्यांनी सांगितलं. दरम्यान या खून प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरू आहे.  याबाबत पोलिस अधिक्षकांना आपल्या बरोबर संपर्क केला होता असे धनंजय यांनी सांगितलं. जसा तपास पुढे जाईल तशी माहिती आपल्याला दिली जाईल असंही धनंजय यांनी यावेळी बोलताना सांगितली. त्यामुळे गावकरी आणि आपलं कुटुंब प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहीण योजनेबाबत उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य, थेट महायुतीवर निशाणा

संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण सर्वत्र गाजत आहे. अशा वेळी माझ्या भावाला न्याय मिळाला पाहीजे असं धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलं. वेगवेगळ्या चौकश्यांची मागणी केली जात आहे. मात्र चौकशी कोणती ही झाली तरी चालाले. न्याय मिळणे हे गरजेचे आहे असंही ते म्हणाले. ज्या पद्धतीने भावाचा खून झाला आहो तो क्रुरपणे केला गेला. त्यामुळे आपण पहिल्या दिवसा पासून एक गोष्ट मागत आहे ती म्हणजे न्याय. संतोष देशमुख यांच्यासाठी संपुर्ण गाव न्यायाच्या प्रतिक्षेत असल्याचेही त्यांनी सांगितलं.