मोठी बातमी : सपट कंपनीच्या चहा पावडरमध्ये आढळली कीटकनाशके

तुम्ही रोज घेत असलेल्या चहाची पावडर किती सुरक्षित आहे हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

तुम्ही रोज घेत असलेल्या चहाची पावडर किती सुरक्षित आहे हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. चहामधील लोकप्रिय ब्रँड असलेल्या सपट कंपनीच्या चहा पावडरमध्ये कीटकनाशकं आढळली आहेत.  अन्न आणि औषध गुप्तवार्ता विभागाच्या कारवाईमध्ये कीटकनाशके आढळली. सपट चहाच्या डेपोवर राज्यात ठिकठिकाणी धाडी टाकत मोठ्या प्रमाणावर साठा जप्त करण्यात आला आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

सपट चहामध्ये मोठया प्रमाणावर कीटकनाशकं असल्याचे संशयावरून अन्न आणि औषध प्रशासनाच्या नाशिक कार्यालयाने सपट चहाचे नमुने विश्लेषणासाठी घेतले होते. त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर सपट चहाचे  सहयाद्री कडक, सहयाद्री इलायची, सपट हॉटेल डस्ट आणि सपट परिवार फॅमिली मिक्स या अन्न पदार्थामध्ये कीटकनाशकाचं प्रमाण जास्त आढळले. त्यामुळे ते मानवी आरोग्यासाठी असुरक्षित असल्याचं घोषित करण्यात आलं आहे.  

कुठे कुठे धाडी? 

1) या धाडसत्राअंतर्गत पुणे येथील सपट इंटरनॅशनल प्रा. लि. वडकी येथे गुप्तवार्ता विभागाचे अधिका-यांचे पथकाने छापा टाकत सपट चहाचा सुमारे 14 लाख 60 हजार 850 रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. 

२) औरंगाबाद येथे डब्ल्यू 17, वाळूंज एमआयडीसी येथील कंपनीच्या डेपोवर छापा टाकत सुमारे 12 लाख 15 हजार 360 रूपये किंमतीचा सहयाद्री कडक, सहयाद्री इलायची, परिवार फॅमिली ब्लेंड आणि सहयाद्री हॉटेल डस्ट या चहाचा साठा जप्त करण्यात आला. 

३) सातारा येथील मे. महालक्ष्मी टेडींग शाहुपरी या पेढीवर छापा घालुन सपट चहाचा सुमारे 36 हजार 120 रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला

४)  कोल्हापूर येथील श्री बालाजी एजन्सी, गडहिंग्लज या पेढीवर घेण्यांत आलेल्या कारवाई मध्ये चहाचा सुमारे 1 लाख 41 हजार 260 रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. 

( नक्की वाचा : IPS Bhagyashree Navtake पुणे पोलिसांमध्ये खळबळ! आयपीएस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल )

हे सर्व नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली आहे. 
 

Topics mentioned in this article