Tanisha Bhise Case : दीनानाथ मंगेशकर नाही तर 'या' दोन हॉस्पिटलवर ससूनच्या अहवालात ठपका

Tanisha Bhise Case : पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि डॉ. घैसास यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

रेवती हिंगवे, प्रतिनिधी

Tanisha Bhise Case : पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि डॉ. घैसास यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या ससून हॉस्पिटलचा अहवाल आज (गुरुवार, 17 एप्रिल) सादर करण्यात आला. या अहवालात मंगेशकर हॉस्पिटल आणि डॉ. घैसास यांच्यावर कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नाही.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे अहवाल?

ससूनच्या डॉक्टरांची त्यांचा चौकशी अहवाल पुणे पोलिसांना सादर केला. यामध्ये डॉ. घैसास यांनी कोणतेही गंभीर आक्षेपार्ह कृत्य केलेले नाही, पुरावे फारसे उपलब्ध नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

या अहवालात तनिषा यांच्यावर उपचार करणारे मणिपाल हॉस्पिटल, सूर्या हॉस्पिटल तसंच इंदिरा आयव्हीएफ यांनी काही चूका केल्याचा ठपका ठेवण्यात आलाआहे. मणिपाल हॉस्पिटलनं कोणतंही पोस्टमार्टम केले नाही.  सूर्या हॉस्पिटलमध्ये या तनिषा भिसे यांना दाखल करण्यात आले होते. त्यावेळी कोणतेही विशेषतज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नव्हते. हे नियमांचं उल्लंघन आहे, असा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. 

( नक्की वाचा : दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, दिला मोठा आदेश! )
 

पुणे पोलिसांचं ससून हॉस्पिटलला पत्र

दरम्यान, हा अहवाल सादर झाल्यानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा ससून हॉस्पिटलला पत्र पाठवलं आहे. डॉ. घैसास यांच्या संदर्भातील स्पष्ट मत समितीनं कळवावं. या अहवालात त्याबद्दल काहीही विशेष आढळून येत नाही, असं पुणे पोलिसांनी कळवलं आहे. 

Advertisement

काय आहे प्रकरण?

पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने वेळेत उपचार न दिल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप आहे. दोन जुळ्या मुलींना जन्म देणाऱ्या तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असून मंगेशकर रुग्णालयाने दाखवलेल्या असंवेदनशीलतेचा निषेध करण्यात आला.

या घटनेच्या दिवशी सकाळी नऊ वाजता पेशंट हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी पेशंटला बोलावले तपासणी केले तसेच इतर डॉक्टरांना ऑपरेशन करण्याबाबत सूचना दिल्या. त्यापद्धतीने स्टाफने तयारी केली.मात्र पेशंटला ऑपरेशनला न्यायच्या आधी त्यांनी दहा लाखांची मागणी केली. हा सगळा प्रकार पेशंटच्या समोरच घडत होता. पेशंटच्या नातेवाईकांनी तीन लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली होती मात्र याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. 

Advertisement