Shocking News : IT रेड सुरु असतानाच बड्या उद्योगपतीची आत्महत्या, चौकशीत नेमकं काय घडलं?

Confident Group Chairman Dr. C.J. Roy: व्यवसायातून मिळवलेली प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर असताना या उद्योगपतीनं आत्महत्या का केली, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Confident Group Chairman : या धक्कादायक घटनेमुळे आता उद्योग विश्वात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
मुंबई:

Confident Group Chairman Dr. C.J. Roy Commits Suicide: एका मोठ्या उद्योगपतीनं अचानक टोकाचं पाऊल उचलल्यानं संपूर्ण व्यापार जगतात खळबळ माजली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील एक मोठं नाव, ज्यांच्या नावावर शेकडो प्रोजेक्ट्स आणि हजारो लोकांचा विश्वास होता, त्या व्यक्तीने आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं आहे. ही घटना घडली तेव्हा आयकर विभागाचे अधिकारी त्यांच्या कार्यालयात तपास करत होते. या धक्कादायक घटनेमुळे आता उद्योग विश्वात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

व्यवसायातून मिळवलेली प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर असताना या उद्योगपतीनं आत्महत्या का केली, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून सुरू असलेला आयकर विभागाचा ससेमिरा आणि मानसिक तणाव हे यामागचं प्रमुख कारण असल्याचं बोललं जात आहे. ही दुर्दैवी घटना कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगलुरु शहरात घडली आहे.

काय आहे प्रकरण?

कॉन्फिडेंट ग्रुपचे चेअरमन डॉ. सी.जे. रॉय यांनी बेंगलुरुमधील अनेपल्या भागात असलेल्या आपल्या निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून घेतली. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी आयकर विभागाचे अधिकारी रिचमंड रोडवरील त्यांच्या कंपनीच्या कार्यालयात छापेमारी करत होते.

डॉ. रॉय दुपारी कार्यालयात आले होते, जिथे अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास 1 तास चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांनी स्वतःच्या पिस्तुलतून छातीत गोळी झाडून घेतली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Advertisement

( नक्की वाचा : Dog Attack: मॉर्निंग वॉक बेतला जिवावर! पाळीव कुत्र्याचा महिलेच्या मानेवर थेट हल्ला; पाहा थरारक प्रकार, VIDEO )
 

उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्तेचा संशय

मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने डॉ. सी.जे. रॉय यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे टाकले होते. या कारवाईदरम्यान त्यांच्याकडे उत्पन्नाच्या अधिकृत स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता (डिसप्रोपोर्शनेट एसेट्स) असल्याचे काही पुरावे हाती लागल्याचा दावा केला जात आहे. 

वारंवार होणारी ही कारवाई आणि चौकशीमुळे डॉ. रॉय प्रचंड मानसिक दडपणाखाली होते. शुक्रवारी देखील बेंगलुरुमधील त्यांच्या मालमत्तांवर छापे टाकण्यात आले होते, ज्यामुळे त्यांचा तणाव आणखी वाढला होता.

Advertisement

( नक्की वाचा : लग्नाला झाले होते फक्त 2 महिने ! पत्नी प्रियकरासोबत पळाली,पती आणि मध्यस्थानं संपवलं आयुष्य )
 

रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठं नाव

डॉ. सी.जे. रॉय यांनी 2005 मध्ये कॉन्फिडेंट ग्रुपची स्थापना केली होती. गेल्या 2 दशकांत त्यांनी या कंपनीला रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. कर्नाटकसह देशाच्या विविध भागांत त्यांचे निवासी अपार्टमेंट्स, व्हिला आणि कमर्शियल कॉम्प्लेक्सचे प्रकल्प पसरलेले आहेत. एक शिस्तप्रिय आणि कल्पक उद्योजक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाची बातमी समजताच बांधकाम क्षेत्रातील दिग्गजांनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

बेंगळुरूच्या अशोक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रॉय यांच्या कुटुंबाचे अनेक व्यवसाय आहेत आणि त्यांच्यावर काही कायदेशीर खटले देखील सुरू होते. त्यांनी ही आत्महत्या आयकर विभागाच्या कारवाईच्या दरम्यानच केली का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली आहे का, यादृष्टीनेही शोध सुरू आहे.
 

Advertisement

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)