'मी तिला मारले नसते तर..' गर्लफ्रेंडचे 59 तुकडे करुन फ्रिज ठेवणाऱ्या मृत आरोपीच्या नोटमधून ट्विस्ट

Mahalaxmi Murder Case : बंगळुरुमधील मॉलमध्ये काम करणाऱ्या महालक्ष्मीच्या शरीराचे 59 तुकडे करुन ते फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

बंगळूरूमधील महालक्ष्मी या महिलेच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या हत्येनं संपूर्ण देश हादरला होता. बंगळुरुमधील मॉलमध्ये काम करणाऱ्या महालक्ष्मीच्या शरीराचे 59 तुकडे करुन ते फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपी मुक्तीरंजन मुक्तीरंजन रॉयनं देखील काही दिवसांनी ओडिशामधील राहत्या घरी गळफास घेऊन स्वत:चा जीव संपवला. महालक्ष्मी आणि मुक्तीरंजन रिलेशनशिपमध्ये होते. त्यामधून झालेल्या वादातून मुक्तीरंजननं तिची हत्या केली. घटनास्थळी सापडलेल्या आरोपीच्या डायरीमधून ही माहिती समोर आली होती.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

प्रकरणाला नवा ट्विस्ट

मुक्तीरंजननं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमधून एक नवी माहिती समोर आली आहे. मुक्तीरंजनच्या दाव्यानुसार त्यानं स्वसंरक्षणासाठी महालक्ष्मीची हत्या केली. 'मी तिची हत्या केली नसती तर तिनं मला ठार मारलं असतं,' असा दावा मुक्तीरंजननं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या नोटमधून केला आहे. 

मुक्तीरंजननं लिहिलेल्या नोटनुसार 2 आणि 3 सप्टेंबर दरम्यानच्या रात्री दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर त्यानं बाजारात जाऊन धारधार शस्त्र विकत घेतलं. त्या शस्त्रानं महालक्ष्मीची हत्या केली.  तिच्या शरिराचे तुकडे केले आणि ते फ्रिजमध्ये भरले. वॉशरुममधील अ‍ॅसिडनं घर स्वच्छ केलं. त्यानंतर लहान भावासह ओडिशामध्ये तो निघून गेला.

( नक्की वाचा : म्हशींना दिलं जातंय भयंकर इंजेक्शन, दूधातून कॅन्सरचाही धोका! कल्याणमधील धक्कादायक प्रकार

काळी सुटकेस तयार होती...

मुक्तीरंजनच्या नोटमध्ये महालक्ष्मीनंही त्याच्या हत्येची तयारी केली होती, असा दावा करण्यात आला आहे. महालक्ष्मीनं त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी काळी सुटकेस देखील खरेदी केली होती, असं त्यानं लिहिलं आहे. योगायोगानं महालक्ष्मीच्या घरात फ्रिजच्या जवळ पोलिसांना काळी सुटकेस सापडली होती. 

Advertisement

'महालक्ष्मीनं माझी हत्या करुन मृतदेहाचे तुकडे सुटकेसमध्ये भरण्याचं ठरवलं होतं. मी तिला मारलं नसतं तर तिनं माझी हत्या केली असती. मी तिचा स्वरक्षणार्थ खून केला,' असा दावा मुक्तीरंजननं केला आहे. 

महालक्ष्मीकडून मारहाण

मुक्तीरंजन रॉयनं लिहिलेल्या नोट्सनुसार महालक्ष्मी त्याच्यावर दबाव टाकत होती. त्याचबरोबर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मारहाणही करत असे. महालक्ष्मीच्या मागण्या सातत्यानं वाढत होत्या. मी तिला 7 लाखांची सोन्याची चेन दिली होती. त्यानंतरही ती मला मारहाण करत होती,' असा दावा त्यानं केला आहे. 

कसं उघड झालं प्रकरण?
महालक्ष्मी राहत असलेल्या इमारतीतून दुर्गंधी आल्यानंतर तिच्या हत्येचा खुलासा झाला. त्याच इमारतीत राहणारा जीवन याने शोध घेतला तेव्हा तिच्या खोलीतून खूप जास्त दुर्गंधी येत होती. इतकी की तिच्या दाराजवळ उभं राहणं कठीण झालं होतं. दार बाहेरून लॉक होतं. जीवनने तातडीने महालक्ष्मीच्या कुटुंबीयांना फोन केला. रात्री उशीरा 12.30 वाजता महालक्ष्मीचे कुटुंबीय तिथे पोहोचले. दारावरील लॉक तोडून आत शिरले. तर खोलीत रक्त पसरलं होतं. आणि जमिनीवर किडे फिरत होते. घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पसरल्या होत्या. महालक्ष्मीच्या आईने फ्रीज उघडला तर आत मुलीचं कापलेलं डोकं आणि पाय, शरीराचे 59 पेक्षा जास्त तुकडे होते. 

Advertisement