- मध्य प्रदेशात शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या १२ वर्षांच्या विद्यार्थिनीवर दोन महिन्यांपासून अत्याचार
- आरोपी अल्ताफ नावाचा ऑटोचालक असून भाजी पोहोचवण्यासाठी वसतिगृहात येत होता
- मुलगी गर्भवती असल्याचे समजल्यावर तिच्या पालकांना बोलावण्यात आले आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले
Sagar Hostel Rape Case: सर्वांनाच हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या प्रकारात हॉस्टेलमध्ये राहाणारी एक अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याचे अढळून आले आहे. पण त्यामागची धक्कादायक कहाणी या मुलीने सांगताच सर्वच जण हादरून गेले आहेत. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना म्हणावी लागेल. शिक्षण घेण्यासाठी सरकारी वसतिगृहात राहिलेल्या एका 12 वर्षांच्या निरागस मुलीला नराधमाच्या अत्याचाराला बळी पडावे लागले. भाजी देण्याच्या बहाण्याने येणाऱ्या एका आरोपीने चिमुकलीवर दोन महिने सतत अत्याचार केले. ज्यामुळे ती गर्भवती राहिली आहे. त्यानंतर हे बिंग फुटले.
मध्य प्रदेशातील खुरई येथील शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात ही पिडीत तरुणी राहत होती. तिचे वय 12 वर्ष होते. ती आठव्या इयत्तेत शिकत होती. या हॉस्टेलमध्ये एक तरुणी नेहमी भाजी देण्यासाठी येत होता. तो स्वत:ऑटोचालक आहे. त्याची नजर या मुलीवर पडली. त्याने एक दिवस जबरदस्तीने तिच्या रूममध्ये प्रवेश केला. त्याच वेळी तिच्यावर त्याने बलात्कार ही केला. शिवाय बाबत कुणाला सांगतले तर मारून टाकण्याची धमकी ही दिली. त्यामुळे ती मुलगी घाबरली होती. याचाच गैर फायदा त्याने घेतला. तो सतत हॉस्टेलमध्ये येत होता. त्या त्या वेळी तो त्या मुलीवर अत्याचार करत होता. मुलगी ही भीतीपोटी सर्व काही सहन करत होती.
या विद्यार्थिनीवर सतत दोन महिने अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या संबंधातून पीडित मुलगी गर्भवती झाली. एक दिवस तिच्या पोटाक दुखत असल्याची तक्रार तिने वॉर्डनकडे केली. त्यानंतर तिच्या पालकांना बोलावण्यात आले. नंतर तिला रुग्णालयात दाखल ही करण्यात आले. त्यात ती गर्भवती असल्याचं स्पष्ट झाले. हे ऐकून तिच्या घरच्याच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांना मोठा धक्का बसला. हॉस्टेल प्रशासन ही हादरून गेले. पोलिसांनी त्या मुलीकडे याबाबत चौकशी केली. तिला विश्वासात घेतले. हे सर्व कसे आणि कोणामुळे झाले याची चौकशी तिच्याकडे करण्यात आली. त्यानंतर तिने झालेली सर्व घटना पोलीसांना सांगितली.
या प्रकरणी पोलीसांनी अल्ताफ नावाच्या तरुणाला अटक केले आहे. त्याने धमकावून दोन महिने सतत अत्याचार केला. त्यामुळेच ती मुलगी गर्भवती राहीली. पीडित मुलगी विदिशा जिल्ह्यातील रहिवासी असून ती खुरई येथील शासकीय वसतिगृहात राहून आठवीचे शिक्षण घेत होती. या वसतिगृहात भाजीपाला पोहोचवण्याचे काम हा अल्ताफ करत होता. सप्टेंबर 2025 मध्ये तो विद्यार्थिनीच्या खोलीत शिरून तिच्यावर अत्याचार केला. कोणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याने घाबरलेली मुलगी गप्प राहिली. दरम्यान या घटनेने शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.