Dr. Shirish Valsangkar Death: जिला दिला आधार, तिनेच केला घात, डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येची हादरवणारी INSIDE स्टोरी

Dr Shirish Valsangkar Death Case: वळसंगकर यांच्या आत्महत्येचे धक्कादायक कारण आता समोर आले असून आत्महत्येआधी लिहलेल्या चिठ्ठीतून मोठा खुलासा झाला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

सौरभ वाघमारे, सोलापूर: सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. डॉ. वळसंगकर यांनी 18 एप्रिल रोजी आपल्या निवासस्थानी रात्री साडेआठच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वळसंगकर यांच्या आत्महत्येचे धक्कादायक कारण आता समोर आले असून आत्महत्येआधी लिहलेल्या चिठ्ठीतून मोठा खुलासा झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सोलापुरातील प्रसिद्ध न्युरो फिजिशीयन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चिठ्ठीतून धक्कादायक खुलासा

आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहलेली होती, यामध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी या चिठ्ठीमध्ये केला होता. ज्या महिलेला आपण आयुष्यात मोठं केलं. रुग्णालय प्रशासनाची सूत्रं हाती दिली. त्याच महिलेने आपल्यावर घाणेरडे आरोप केले. हे आता आपल्याला सहन होत नाही.. असा मजकूर या चिठ्ठीमध्ये लिहण्यात आला होता. 

( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : आयपीएलचा इतिहास बदलला, 14 वर्षाच्या मुलानं केलं पदार्पण, पहिल्याच मॅचमध्ये खणखणीत सुरुवात )

त्याच चिट्ठीवरून डॉ. शिरीष वळसंगकर यांचा मुलगा डॉ. आश्विन याने पोलिसात फिर्याद दिली. ज्यानंतर  सदर बाजार पोलीसांनी आरोपी महिला मनीषा मुसळे-मानेला अटक करुन कोर्टात हजर केले. सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायाधीश तथा न्याय दंडाधिकारी दीपक कंखरे यांनी आरोपी महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Advertisement

काय होता नेमका वाद?

डॉ. शिरीष वळसंगकर हे शिस्तप्रिय होते. रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार कागदोपत्री हवी असा त्यांचा आग्रह होता. मात्र मागील काही काळांपासून रुग्णांकडून घेण्यात येणाऱ्या उपचाराच्या रकमेची कुठेही नोंद होत नव्हती ज्यावर त्यांचा आक्षेप होता. मनीष मुसळे माने या महिलेकडे आर्थिक विभाग होता ती कोणतीही नोंद न घेता पैसे स्वीकारत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले होते. याच रागातून त्यांनी तिला कामातून काढून टाकले.

नक्की वाचा - 'आम्ही हिंदूंपेक्षा वेगळे, कलमाच्या आधारावर बनला पाकिस्तान', पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाच्या ओठावर आलं सत्य

दरम्यान, कामातून काढल्याच्या रागातून महिला कर्मचाऱ्याने डॉक्टरांना आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. याबाबतचे एक पत्रही तिने डॉक्टरांना पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. याच त्रासामुळे डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्या केल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. याबाबतचा अधिक तपास सध्या सुरु आहे.

Advertisement