सौरभ वाघमारे, सोलापूर: सोलापूर बस स्थानकावरून एका तीन वर्षे चिमुरडीचे अपहरण करण्यात आले होते.फौजदार चावडी पोलिसांनी तात्काळ पाच तासाच्या आता मुलीचा शोध घेतला.सोलापूर शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर सोलापूर पुणे हायवेवरील मोडनिंब येथील मंगल कार्यालयाजवळ ही तीन वर्षीय मुलगी मिळून आलीय.त्यामुळे मुलीच्या आई वडिलांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथील साहेबराव शिंदे हे आपल्या पत्नीसह सासुरवाडीला जाण्यासाठी सोलापूर बसस्थानकात आले होते. बसचे तिकीट घेण्यासाठी ते तिकीट खिडकीजवळ गेले. तिकीटाला दहा रुपये कम पडल्याने त्यांनी पत्नीला पैसे मागितले. आपल्या बॅगजवळ तीन वर्षीय मुलगी ईश्वरीला थांबवुन पत्नी वीस फूट अंतरावरील पतीला पैसे देऊन परत जागेला गेले. त्या 30 ते 40 सेकंदाच्या कालावधीत त्या ठिकाणाहून मुलगी गायब झाली.
तीन वर्षीय मुलगी ईश्वरी गायब झाल्याने आई वडिलांनी संपूर्ण बसस्थानक आणि परिसरात तिचा शोध घेतला मात्र मुलगी कुठेही मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांची मदत घेतली. फौजदार चावडी पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेतला तर त्यांना 40 ते 45 वयाची महिला मुलीला घेऊन जाताना दिसत आहे.
(नक्की वाचा- मोदी सरकारनं शशी थरुर यांच्यावर सोपावली नवी जबाबदारी, अमेरिकेत फाडणार पाकिस्तानचा बुरखा)
सीसीटीव्हीच्या आधारे सदर महिलेचा पाठलाग करत पोलिस मोहोळ आणि पंढरपूरपर्यंत पोहचले. सदर महिला तीन वर्षीय ईश्वरीचे कानातील बाली आणि पायातील पैंजण काढून घेऊन तिला सोलापूर पुणे हायवेवरील मोडनिंब येथील मंगल कार्यालयाजवळ सोडून गेली. पोलिसांनी तात्काळ मुलीला ताब्यात घेऊन आई-वडिलांच्या स्वाधीन केले. मुलीला पळवून नेणाऱ्या सदर महिलेचा पोलिस कसून शोध घेत आहेत.