Crime News : आईच्या चेहऱ्यावर ठोसे मारत मुलानं घेतला जीव ! धक्कादायक घटनेचा Video पाहून उडेल थरकाप

Mother Killed by Son : आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघड झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Son Killed Mother : मुलानं केलेल्या मारहाणीमध्ये त्याच्या आईचा मृत्यू झाला.
मुंबई:

Mother Killed by Son : आई आणि मुलाचं नातं हे जगातील सर्वात पवित्र नातं मानलं जाते. आई मुलाला 9 महिने स्वत:च्या गर्भात वाढवते. तेव्हापासून त्यांची नाळ जोडलेली असते. आपला मुलाला मोठं करण्यासाठी त्याला आनंदी, यशस्वी करण्यासाठी आई आयुष्यभर कष्ट करते. मुलाला या मातृऋणातून मुक्त होणे कधीही शक्य नसते. पण, आपल्या आईची सेवा करणे, तिला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करणे हे मुलांचं कर्तव्य असतं. पण, आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघड झाली आहे.

मुलानं केली आईची हत्या

एका दारुड्या मुलाने आईला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्याच्या आईचा मृत्यू झाला. आरोपी मुलाने केलेल्या मारहाणीचा व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्याच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

सोमवार, 15 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेत नवीन नावाच्या 27 वर्षीय मुलाने आपली आई संतोष देवीची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलेंडर संपल्यामुळे आईने नवीनला नवा सिलेंडर आणायला सांगितले. याच गोष्टीवरून संतापलेल्या मुलाने आईला बेदम मारहाण केली.

( नक्की वाचा : SBI Bank Robbery : बँकेत घुसून 21 कोटींची लूट; बनावट व्हॅनचा वापर, पळून जाताना अपघात... पुढे काय घडलं? )
 

या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये, आरोपी नवीन आपल्या आईला बेडवर पाडून तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर सलग जोरदार ठोसे मारताना दिसत आहे. वडील लक्ष्मण सिंह आणि बहिणी त्याला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तो इतका आक्रमक झाला होता की, कोणाचेही ऐकायला तयार नव्हता. कुटुंबातीलच एका सदस्याने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो आता या गुन्ह्यातील महत्त्वाचा पुरावा बनला आहे.

Advertisement

डीसीपी वेस्ट हनुमान प्रसाद मीणा यांनी सांगितले की, पीडित संतोष देवी (50) आपल्या दोन मुली आणि मुलगा नवीनसोबत करधनी पोलीस स्टेशन परिसरातील अरुण मार्गावर राहत होत्या. तिचे पती लक्ष्मण सिंह 10 वर्षांपूर्वी सैन्यातून निवृत्त झाले असून, सध्या ते दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल आहेत.

( नक्की वाचा : Dombivli: एका शिक्षिकेला फसविले; दुसरीसोबत लग्न, तिसरीपासून मुल, डोंबिवलीतील शिक्षकाचे धक्कादायक कृत्य )
 

मुलगा अट्टल दारुडा

आरोपी नवीन दारुच्या आहारी गेल्यामुळे घरात नेहमीच वाद होत असत. त्याचा हातातोंडावर मारामारी करण्याचा स्वभाव असल्यामुळे आजूबाजूचे लोकही त्याच्यापासून दूर राहायचे. त्याचे लग्न झाले होते, पण सहा महिन्यांतच त्याच्या पत्नीने त्याला सोडून दिले होते आणि त्याच्या विरोधात मारहाण व हुंड्याच्या छळाचा गुन्हाही दाखल केला होता.

Advertisement

या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी नवीनला अटक केली आहे. पुढील चौकशी सुरू आहे. दरम्यान, संतोष देवी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंब हरियाणातील महेंद्रगड येथील त्यांच्या मूळ गावी गेले आहे.
 

येथे पाहा Video

Topics mentioned in this article