Crime News: माश्यांची आमटी कुत्र्याने खाल्ली, लेकाच्या डोक्यात सनक गेली, पुढे भयंकर घडलं

खून केल्यानंतर आरोपी अवलेश याने तिथून पळ काढला. तो शेतात लपून बसला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
धुळे:

पोटच्या मुलानेच आईला बेदम मारहाण करुन आईची हत्या केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. जेवणासाठी बनवलेली माश्यांची आमटी कुत्र्यांने खाल्ली. त्याचा राग मुलाला आला. त्या रागातून मुलाने चक्क आईचा निर्घुण खून केला. ही धक्कादायक घटना धुळे शिरपूर तालुक्यात घडली आहे. या घटनेनंतर संशयीताला पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतले आहे.  त्याच्या विरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शिरपूर तालुक्यातील ताजपूरी शिवारात देवेंद्र भलेसिंग राजपूत यांच्या शेतात रखवालदारीसाठी काम करणारं कुटूंब राहतात. तेथे राहणारा अवलेश रेबला पावरा याने त्याच्या आई टापीबाई रेबला पावरा यांना माशांची आमटी करण्यासाठी सांगितले होते. टापीबाई यांनी आमटी बनवून ठेवली होती. मात्र शेतातील कुत्र्याने ती आमटी खाल्ली. त्याचा राग आल्याने अवलेश रेबला पावरा याने आपल्या वृध्द आईला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात टापीबाई रेबला पावरा यांचा मृत्यू झाला. 

ट्रेंडिंग बातमी - Pune News: हृदय सुन्न करणारी घटना! आईसह दोन लेकरांची हत्या, मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचाही प्रयत्न

खून केल्यानंतर आरोपी अवलेश याने तिथून पळ काढला. तो शेतात लपून बसला होता. झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसही घटनास्थळी तातडीने रवाना झाले. तिथे काही लोकांकडे याबाबत चौकशी केली. त्यावर प्रत्यक्षदर्शीने झालेला घटना सांगितली. त्यानंतर अवलेश याचा शेतातल्या झाडी झुडपांमध्ये शोध घेण्यात आला. पोलिसांना त्याला शोधून काढण्यात यश आलं. पुढे त्याला अटक करण्यात आली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Monsoon news: मान्सून 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल,'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता

इतक्या शुल्लक कारणामुळे मुलानेच आईचा थेट खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिवाय हळहळ ही व्यक्त केली जात आहे. झालेली घटना ही दुर्दैवी असल्याचं सर्वच जण बोलत आहे. आज काल कुणाला कसला राग येईल हे सांगता येत नाही. त्याचा काही नेम ही नाही. गेल्या काही दिवसातील घटना पाहाता अशा घटना कुठे ना कुठे होत असल्याचे दिसून आले आहे. शुल्लक कारण जीववर बेतत आहे. 

Advertisement