राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या कुटुंबात 11 मे हा दिवस आनंदाचा होता. मित्रमंडळी उत्साहात होते. हे एक साधं लग्न होतं. कोणालाही कल्पना नव्हती की, काही दिवसांतच हे लग्न देशभर चर्चेचा विषय बनेल. मध्य प्रदेशातील इंदूरमधून मेघालयला हनिमूनसाठी गेलेले नवविवाहित जोडपे, राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांची कहाणी संपूर्ण देशाला हादरवून टाकणारीच आहे. एक स्वप्नवत हनिमून, जो आनंदाचं प्रतीक असायला हवा होता, तो एका भयानक शोकांतिके बरोबरच रहस्यमय हत्याकांडात बदलला. या प्रकरणामुळे केवळ मेघालय पोलिसच नव्हे, तर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश पोलिसांनाही तपासात सहभागी व्हावं लागलं. काय आहे या भयंकर हत्याकांडाचा घटनाक्रम त्यावर एक लक्ष टाकूयात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
20 मे 2025: हनिमूनसाठी मेघालयला रवाना
लग्नाच्या अवघ्या 9 दिवसांनंतर हे नवं जोडपं हनिमूनसाठी मेघालयला रवाना झालं. विशेष म्हणजे, हनिमूनचं संपूर्ण नियोजन सोनमने स्वतः केलं होतं. तिकिटापासून ते हॉटेल बुकिंगपर्यंत सर्व काही सोनमच्या नावावर होतं. पोलिसांच्या मते, येथूनच कटाची सुरुवात झाली होती.
23 मे 2025: नोंग्रियात गावात पोहोचले, नंतर बेपत्ता
राजा आणि सोनम मेघालयमधील शिलाँग येथे डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज, नोंग्रियात गाव पाहण्यासाठी गेले. हेच ते ठिकाण होतं, जे या हत्याकांडाचं मूक साक्षीदार बनलं. त्याच दिवशी दोघे अचानक बेपत्ता झाले. त्यानंतर ना राजाचा पत्ता लागला, ना सोनमचा. कुटुंब काळजीत पडलं.
24 मे 2025: स्कूटी बेवारस अवस्थेत सापडली
दुसऱ्या दिवशी त्यांची भाड्याची स्कूटी सोहराजवळ एका निर्जन ठिकाणी बेवारस अवस्थेत सापडली. हाच पहिली छडा होता, ज्यामुळे पोलिसांना प्रकरणाचं गांभीर्य जाणवलं. त्यानंतर बेपत्ता जोडप्याची तक्रार दाखल करण्यात आली.
25 ते 31 मे 2025: शोधमोहीम सुरू झाली
पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली. कुटुंब इंदूरहून शिलाँगला पोहोचलं. सोनमचा कोणताही सुगावा लागला नाही. माध्यमांमध्ये याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. पाहाता पाहाता हे जोडपं देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. मग हळूहळू संशयाची सुई सोनमकडे फिरू लागली.
2 जून 2025: राजाचा मृतदेह सापडला
पुढच्याच दिवशी, म्हणजेच 2 जून रोजी पोलिसांना वेईसावडॉन्ग वॉटरफॉलजवळ एका खोल खड्ड्यात एक मृतदेह सापडला. मृतदेहाची अवस्था खूप खराब होती. ओळख पटवणं कठीण होतं. पण राजाच्या हातावर गोंदलेल्या 'राजा' टॅटूने त्याची ओळख पटवली. शवविच्छेदनात हत्येची पुष्टी झाली. राजाचा मृत्यू डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि त्याला ढकलून दिल्यामुळे झाला होता.
3 ते 5 जून 2025: सोनम गायब, कटाची गुंतागुंत वाढली
मृतदेह सापडल्यानंतर सोनमचं गायब राहणं पोलिसांच्या शंकांना बळकटी देत होतं. माध्यमांमध्ये बातम्या येऊ लागल्या की सोनमच या हत्याकांडाची सूत्रधार आहे. पोलिसांनी तिचं लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात केली.
9 जून 2025: सोनम गाझीपूरमधून अटक
शेवटी, पोलिसांनी सोनमला उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील एका ढाब्यातून अटक केली. मात्र, बातमी अशी आहे की तिने आत्मसमर्पण केलं आहे. ती लपत-छपत गाझीपूरला पोहोचली होती. अटकेनंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं. नंतर पोलिस रिमांडवर घेण्यात आलं. चौकशीत तिने अनेक धक्कादायक खुलासे केले.
राज कुशवाहाचं नाव समोर आलं
चर्चा आहे की, इंदूरमधीलच राज कुशवाहा सोबत सोनमचं प्रेमसंबंध होते. दोघांचं नातं लग्नापूर्वीपासून होतं. मिळालेल्या माहितीनुसार, सोनमला कुटुंबाच्या दबावाखाली लग्न करावं लागलं. पण ती राजच्या संपर्कात राहिली. मग दोघांनी मिळून राजाच्या हत्येचा कट रचला. राज कुशवाहा यालाही पोलिसांनी अटक केली.
9 जून 2025: डीजीपींची पत्रकार परिषद
मेघालयचे डीजीपी आय नोंगरांग यांनी पत्रकार परिषद घेऊन या हत्याकांडाचं संपूर्ण विवरण दिलं. डीजीपींनी सुपारी किलिंगची (contract killing) शक्यता व्यक्त केली.