Surat Child Kidnapping Case: शिक्षक आणि विद्यार्थी म्हणजेच गुरु शिष्याचं नातं हे सर्वात पवित्र नात्यांपैकी एक मानलं जातं. पण या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणात 23 वर्षांची शिक्षिका तिच्या 13 वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन पळून गेली होती. पोलिसांनी या शिक्षिकेला अटक केलं. पण, त्यानंतर शिक्षिकीनं जी कबुली दिली त्यानं सर्वांच्याच पायाखालची जमीन घसरली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
गुजरातमधल्या सूरतमधले हे प्रकरण आहे. येथील 23 वर्षांची आरोपी शिक्षिका तिच्या 13 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत पळून गेली. पोलिसांनी शिक्षिकेला पकडल्यानंतर 'माझ्या पोटात माझ्या विद्यार्थ्याचंच मूल आहे. मी सध्या पाच महिन्यांची गर्भवती आहे. याच कारणामुळे आम्ही पळून गेलो होतो,' असा दावा या शिक्षिकेनं केला आहे.
या विद्यार्थ्यासोबत दोन वर्षांपासून आपले प्रेम प्रकरण सुरु होते. एक वर्षांपासून आमच्यामध्ये शीरीरिक संबंध होते. या संबंधामधून आपण गर्भवती झाल्याचं लक्षात आल्यानंतर मी विद्यार्थ्याला घेऊन पळून गेले, असं या शिक्षिकेनं सांगितलं.
( नक्की वाचा : धक्कादायक! मासिक पाळीत स्वयंपाक केला नाही म्हणून विवाहितेचा घेतला जीव? )
ही शिक्षिका 13 वर्षांच्या विद्यार्थ्याच्या घरी ट्यूशन घेण्यासाठी जात असे. हे दोघं 25 एप्रिल रोजी पळून गेले होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथकांची स्थापना केली होती. अखेर 30 एप्रिल रोजी या दोघांना ताब्यात घेण्यात आलं. विद्यार्थ्यासोबत दुसऱ्या शहरामध्ये लपून राहण्याची आपली योजना होती, असं या शिक्षिकेनं सांगितलं.
दरम्यान हा विद्यार्थी बाप बनण्यासाठी सक्षम आहे, असं मेडिकल चाचणीमध्ये स्पष्ट झालं आहे. गर्भातील मुलाची डीएनए टेस्ट केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं. या शिक्षिकेवर अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर तिच्यावर पोक्स कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आरोपी शिक्षिकेची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. ती विद्यार्थ्याला घेऊन बडोद्यातील एका हॉटेलमध्ये गेली होती. त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळवलंय. त्याचबरोबर अन्य पुरावे देखील गोळा करण्याचे काम सध्या सुरु आहे, अशी माहिती सूरत पोलिसांनी दिली आहे.