Swargate Rape Case: पीडितेसोबत सहमतीने संबंध? स्वारगेट अत्याचार प्रकरणात 5 खळबळजनक खुलासे

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे,  पुणे: पुण्याच्या स्वारगेट स्थानकातील अत्याचार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आली आहे. शिरुर तालुक्यातील गुनाट गावात 72 तासांच्या सर्च ऑपरेशननंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. अटकेनंतर आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. यासोबतच त्याने एक मोठा दावा केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले अमितेश कुमार?

रात्री 1 वाजता अटक...

"काल रात्री एक वाजता आरोपीला त्याच्या गावातून अटक करण्यात आली. आरोपीला पकडण्यात गावकऱ्यांची मोठी मदत झाली. रात्रीच्या अंधारात आरोपीला पकडणे अवघड होते. मात्र गावकऱ्यांनी ज्या उत्फुर्तपणे त्याला पकडण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यासाठी त्यांचे आभार मानतो. पोलीस गुनाट गावात जाऊन गावकऱ्यांचे आभार मानतील," असं अमितेश कुमार म्हणाले.

आरोपीचा धक्कादायक दावा..

तसेच "पोलीस कोठडीत नेल्यानंतर आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली देत एक धक्कादायक दावाही केला आहे. माझं चुकलं मी पापी आहे, म्हणत त्याने टाहो फोडला. तसेच मी अत्याचार केला नाही, सहमतीने संबंध झाले," असा दावाही केला. मात्र पोलिसांनी यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे म्हणत या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचे सांगितले आहे. 

नक्की वाचा- Pune Rape Case : ...तर 'ती' वासनेचा बळी झाली नसती! स्वारगेट स्थानकात सुरु होते 'हे' काळे धंदे; वाचा स्फोटक रिपोर्ट)

 आत्महत्येचा प्रयत्न...

"धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. आरोपीच्या मानेवर व्रण आढळून आले आहेत. त्याच्या मेडिकल चाचणीमध्येही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शक्यता आहे, असं पोलीस आयुक्त म्हणालेत. तसेच आत्महत्या करायला गेला मात्र दोरी तुटल्याने आणि गावकरी पोहोचल्याने त्याचा प्रयत्न फसल्याची चर्चा असल्याचेही ते म्हणालेत. 

आरोपीला पकडण्यास उशीर.. पोलिसांची कबुली

यावेळी "आरोपीला पकडण्यात खुप उशिर झाल्याची कबुलीही पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे.  घटना घडल्यावर दोन - अडीच तासामध्येच आरोपीची ओळख पटली होती. पोलीस ताबडतोब त्याच्या गावात गेले मात्र तो तिथे नव्हता. 400 ते 500 ग्रामस्थांची त्यामध्ये चांगली मदत झाली. श्वान पथकाने चांगली कामगिरी केली तसेच ड्रोनमुळे लोकेशन सापडले," असंही ते म्हणाले.

Advertisement

Pune Rape Case : ...तर दत्ता गाडे सापडलाच नसता; काय होता स्वारगेट अत्याचारातील नराधमाचा प्लॅन B

एका लाखाचे बक्षीस कुणाला?

"ज्यांनी शेवटच्या क्षणाला आरोपी कुठे आहे? याबाबतची माहिती दिली, त्या व्यक्तीला एका लाखाचे बक्षीस दिले जाईल. तसेच गुनाट गावासाठी काय करता येईल, याबाबतही आम्ही विचार करु. आम्ही गावात जाऊन गावकऱ्यांचा सत्कार करणार आहोत," असे म्हणत एका लाखाच्या बक्षीसाबाबत अमितेश कुमार यांनी महत्वाची माहिती दिली आहे.