शिक्षकाकडून अल्पवयीन मुलांवर अत्याचार, 'असा' उघड झाला प्रकार

अंबरनाथ पश्चिमेच्या वांद्रापाडा परिसरात एका सेवाभावी संस्थेची शाळा आहे. या शाळेत परिसरातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात.

जाहिरात
Read Time: 2 mins
अंबरनाथ:

अंबरनाथमध्ये एका सेवाभावी संस्थेच्या शाळेत एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाने शिक्षकीपेशाला कलंक लागेल असे कृत्य केले आहे. या शिक्षकाने शाळेतल्या अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. वांद्रापाडा परिसरातील संस्थेच्या शाळेत हा सर्व प्रकार सुरू होता. पोलिसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.

अंबरनाथ पश्चिमेच्या वांद्रापाडा परिसरात एका सेवाभावी संस्थेची शाळा आहे. या शाळेत परिसरातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील काही अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत इथला शिक्षक अश्लील लैंगिक चाळे करत होता. तसंच या प्रकरणाचा व्हिडिओ ही तो तयार करत होता. त्यातून तो या मुलांना ब्लॅकमेल देखील करत होता. त्यामुळे घाबरलेल्या काही मुलांनी शाळेत जायला नकार दिला. शाळेचं नाव काढल्यानंतर ते शाळेत जाण्यास टाळाटाळ करत होते.

हा सर्व प्रकार विद्यार्थ्यांच्या पालकांना संशयास्पद वाटला. त्यांनी याबाबत आपल्या मुलांकडे चौकशी केली. त्यांना विश्वासात घेतलं. त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी या नराधम शिक्षकाविरोधात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शिवाय त्याला अटक करण्यात आली आहे. उल्हासनगर न्यायालयात त्याला हजर केलं जाणार असल्याची माहिती अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे.

शिक्षकानेच हा घृणास्पद प्रकार केल्याने अंबरनाथ शहरात खळबळ उडाली आहे. बदलापूरमध्येही असाच प्रकार झाला होता. त्यानंतर नागरिकांचा प्रक्षोभ पाहायला मिळाला. या घटनानंतर अत्याचाराच्या घटना कमी झालेल्या नाहीत. कुठेना कुठे या घटना होताना दिसत आहे. शाळांमध्ये असे प्रकार वाढताना दिसत आहेत. त्यामुळे विद्यार्थी किती सुरक्षित आहेत असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. शिवाय त्यांच्या सुरक्षेचे काय अशी विचारणाही होत आहे.

Advertisement