Tennis player Radhika Yadav: गुरुग्राममध्ये टेनिसपटू राधिका यादवची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे राधिकाच्या वडिलांनीच तिला गोळ्या घातल्या होत्या. ही घटना गुरुग्रामच्या सुशांत लोक-२ येथील त्यांच्या निवासस्थानी घडली. पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
राधिकाला गोळ्या लागल्यानंतर गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ही घटना दुपारच्या सुमारास 12 वाजण्याच्या आसपास सेक्टर 57 येथील राधिकाच्या घरी घडली, जिथे ती आपल्या कुटुंबासोबत राहत होती. आरोपी वडिलांनी आपली मुलगी राधिकावर सलग तीन गोळ्या झाडल्या. गुरुग्राम पोलिसांनी मारेकरी वडिलांना अटक केली असून, त्यांनी हत्येसाठी वापरलेले रिव्हॉल्वरही घटनास्थळावरून जप्त केले आहे.
(नक्की वाचा :'माझ्या ब्लाऊजमध्ये हात घातला आणि...' अभिनेत्रीचा पुजाऱ्यावर गंभीर आरोप! )
राधिका राज्यस्तरीय टेनिसपटू होती आणि तिने अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'रील्स' बनवण्यावरून झालेल्या वादामधून ही घटना घडली.
राधिका यादव कोण होती?
राधिका यादव ही राज्य स्तरीय टेनिसपटू होती. तिनं अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ (ITF) मध्ये दुहेरी टेनिसपटू म्हणून तिची रँकिंग 113 होती आणि ती ITF दुहेरीमधील टॉप 200 खेळाडूंमध्ये समाविष्ट होती. राधिकाचा जन्म 23 मार्च 2000 रोजी झाला होता.