तीन वाहनांचा विचित्र अपघात, 4 जण ठार तर 8 गंभीर जखमी

पहाटे साडे चारच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला. पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने त्याने समोरच्या टेम्पोला जोरदार धडक दिली.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

मुंबई पुणे महामार्गावर पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. तीन वाहानांचा हा विचित्र अपघात झाला आहे. ट्रक, टेप्मो आणि एक चारचाकी यांची धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 8 जण जबर जखमी झाले आहेत. पहाटे 4.30 वाजता हा अपघात झाला.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पहाटे साडे चारच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला. पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने त्याने समोरच्या टेम्पोला जोरदार धडक दिली. ही धडक इतरी जबरदस्त होती की त्यात आणखी एका ओमनी गाडीला याची धडक बसली. ज्या टेम्पोला धडक दिली गेली त्यात कोंबड्या होत्या. ज्या ट्रकने धडक दिली त्याचा संपुर्ण चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, खोपोली पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल, सामाजिक संस्था यांनी घटना स्थळी धाव घेतली. त्यावेळी महामार्गावर मोठ्या प्रमाणात ट्राफीक जाम झाले होते. मात्र तातडीने ते सुरळी करण्यात आले. 

हेही वाचा - राष्ट्रपती दौपद्री मुर्मूंच्या हस्ते महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार' प्रदान

या अपघातात 4 जणांची मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत. शिवाय 8 जण जखमी झालेले आहे. जे जबर जखमी आहेत त्यांना एमजीएम रूग्णालयात तातडीने हलवण्यात आले. तर काही जखमींना स्थानिक खोपोलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यांचा या अपघातात मृत्यू झाला त्यांचे मृतदेह खोपोलीच्या रुग्णालयात नेण्या आले आहे. चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. 

Advertisement